Amalner: गणेशोत्सव निमित्त ग्रामीण रुग्णालय,लालबाग शॉपिंग सेंटर आणि ठेला गाडी मित्र मंडळ तर्फे एचआयव्ही पोस्टर प्रदर्शन व तपासणी शिबिर संपन्न…
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयच्या आयसीटीसी विभाग आणि लालबाग शॉपिंग सेंटर व ठेला गाडी मित्र मंडळच्या संयुक्त विद्यमानाने गणेश उत्सवानिमित्त समाजात एचआयव्ही एड्स जन जागृती व्हावी या उद्देशाने पोस्टर प्रदर्शन आणि एचआयव्ही तपासणी शिबिर घेण्यात आले.
भाजी मार्केट परिसरातील अनेक कामगार व नागरिक यांनी उत्सुकतेने गणपती मंडळास भेट देऊन एचआयव्हीबाबत माहिती घेऊन तपासणी देखील करून जनजागृती मोहिमेत सहभाग नोंदविला. यात मंडळाचे अध्यक्ष लखत कोराणी,
उपाध्यक्ष नागराज पाटील व सभासद विठ्ठल मोरे व मित्र परिवार यांचे विशेष सहभाग होता.
उपक्रम यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयाचे आयसीटीसी समुपदेशक अश्वमेघ पाटील, दीपक शेलार, एआरटी समुपदेशक जयेश मोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे, मोरे ताई यांनी प्रयत्न केले.