रावेर पं.स.च्या बिडीओ यांनी पत्राद्वारे गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे दाखवले बोट!
“मात्र सदर प्रकरणी कायदेशीर मार्गाने योग्य त्या संबंधित पोलीस विभागात किंवा न्यायालयात लवकरच फिर्याद दाखल करणार असल्याची माहिती माध्यमाला तक्रारदार युसूफ शाह यांनी समक्ष विचारणा केल्यावर दिलेली आहे.”
—————————————-
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर पंचायत समिती येथे ३ अपत्ये असून आदर्श शिक्षक पुरस्कार साठी स्वतःला गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांच्या मदतीने पात्र ठरवून घेतलेल्या जि.प.उर्दु शाळा नं.१ रावेर येथील शाळेतील महिला उपशिक्षक गजाला तबस्सुम यांच्या बाबतची रावेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील सकारी दप्तरी नोंद असलेली माहिती सावदा येथील जागृत नागरिक युसूफ शाह सुपडू शाह यांनी दि.८/११/२०२१ रोजी माहिती अधिकार अर्जाद्वारे मागणी केलेली माहितीचे कागदपत्रे मुदतीत देण्यात आले नसल्याने यावर नियमानुसार दाखल केलेल्या प्रथम अपील अर्जाची सुद्धा पंचायत समिती रावेर येथे दाखल घेण्यात आलेली नाही.सबब या संदर्भात गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांची समक्ष भेट घेऊन लेखी तक्रार करूनही काही एक कायदेशीर कारवाई झाली नाही.यानंतर थेट सरासरी ९ महिने उलटल्यानंतर येथील गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांनी असमाधानकारक व सत्य प्रकार उघडकीस होवू नये.महणून थेट सदरील महिला उपशिक्षक यांना पाठीशी घालणारा वगैरे उल्लेख आलेला नियमबाह्य पद्धतीचा फक्त एक पत्र सदरील अर्जदारास पोस्टाने पाठवले आहे.
सदरील नियमबाह्य पद्धतीच्या प्राप्त पत्रावरून युसूफ शाह यांनी गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती रावेर यांना “आपण माहिती अधिकार अर्ज व प्रथम अपील अर्जाची मुदतीत दखल घेतली नसून थेट माहिती अधिकार अधिनियम २००५ चे जाणीवपूर्वक उल्लंघन करून आपण मला सरासरी ९ महिन्यांनंतर रजिस्टर पोस्टाने असमाधानकारक लेखी उत्तर पाठवल्या बाबत.व गटविकास अधिकारी यांच्या कडून योग्य तो न्याय न मिळणे बाबत.तक्रार वजा नोटीस अर्ज”याविषया खाली सविस्तर लेखी नोटीस दि.३/८/२०२२ रोजी सादर करून यांची प्रत माहिती व कारवाई साठी थेट मुख्याकार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षण अधिकारी जि.प.जळगांव यांना सुद्धा दिलेली आहे.
तरी आधीच सदर प्रकरणाची अधिकृत माहिती असतांना देखील वेळप्रसंगी दखल न घेता.आता सदरच्या प्राप्त तक्रार वजा नोटीस वरून गटविकास अधिकारी रावेर यांनी थेट दि.२४/८/२०२२ रोजी स्वत:च्या सहीने संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना पाठवलेले पत्रात म्हटले आहे की,सदरील तक्रारीत नमूद सर्व बाबी आपल्या कार्यालयीन स्तरावरच्या असल्याने आपण सदर पत्रावर तात्काळ कार्यवाही करून तक्रारदारास परस्पर कळवावे.व केलेल्या कार्यवाहीच्या अहवालाची एक प्रत या कार्यालयात सादर करावी.तरी या वरून दिसून येते की,वेळप्रसंगी ठोस कारवाई न करता कशा प्रकारे अधिकारी वेळकाढूपणा करून सत्य उघडकीस होवू नये.म्हणून वरीलप्रमाणे भुमिका घेतात.






