Rawer

निंभोरा बु. येथे रावेर तालुका ग्रामीण पत्रकारांची स्नेहविचार सभा उत्साहात संपन्न

निंभोरा बु. येथे रावेर तालुका ग्रामीण पत्रकारांची स्नेहविचार सभा उत्साहात संपन्न

रावेर.
प्रतिनिधी संदीप कोळी –

रावेर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी कृषीतंत्र विद्यालय निंभोरा बु, येथे स्नेहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील निंभोरा बु येथे दिनांक २८/०८/२०२२. रविवार रोजी सकाळी ११.२० वाजता कृषी तंत्र विद्यालय निंभोरा बु येथे ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी पत्रकारिता करीत असतांना येणाऱ्या अडचणी व त्याचा होणारा परिणाम पत्रकारिता चा अनुभव याकरिता स्नेह विचार सभेचे आयोजन करण्यात आले. या स्नेह विचार सभेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार राजीव दादा बोरसे हे होते.यावेळी दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार अनिल आसेकर यांनी पत्रकारांना येणाऱ्या अडचणी यावर फार मोलाचे मार्गदर्शन केले. रावेर तालुक्यात ग्रामीण भागात पत्रकारांची भक्कम संघटना तयार करावे. असे त्यांनी सांगितले अध्यक्षीय भाषणात जेष्ठ पत्रकार राजीव दादा बोरसे यांनी संघटना मजबूत झाली तर पत्रकारांवर होणारे हल्ले थांबतील, संघटनेचे महत्व त्यांनी उदाहरण देऊन पटवून सांगितले.या स्नेह विचार सभेला विनोद कोळी (शिवाभाऊ), राजीव बोरसे, प्रमोद कोंडे, ज्ञानेश्वर महाजन, अनिल आसेकर, प्रभाकर महाजन, विनायक जहूरे,संजय पाटील, विजय अवसरमल, इक्बाल पिंजारी, आकाश भालेराव, गणेश सेठी, प्रशांत पाटील, चंद्रकांत वैदकर, राहूल जैन,सागर तायडे, दस्तगीर खाटीक, संकेत पाटील,राजेंद्र महाले,श्रीराम पाटील,बंडू (संदीप) कोळी, दिलीप सोनवणे,आशिष चौधरी व असंख्य पत्रकार मित्र उपस्थित होते.कार्यकमाचे सूत्रसंचालन विजय अवसरमल तर आभार प्रदर्शन विनायक जहुरे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button