Amalner

Amalner: द्रौ.रा.कन्याशाळेच्या विद्यार्थिनींनी बनवल्या बाप्पाच्या सुबक मूर्ती

Amalner: द्रौ.रा.कन्याशाळेच्या विद्यार्थिनींनी बनवल्या बाप्पाच्या सुबक मूर्ती

अमळनेर(प्रतिनिधी)
खानदेश शिक्षण मंडळ संचलित द्रौ.रा.कन्याशाळेत शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यावेळी सुबक मूर्ती बनविणाऱ्या विद्यार्थिनींना पारितोषिक देण्यात आले.
विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या उपक्रमशील उपशिक्षिका पी.एस.सराफ यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.६८ विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.विद्यार्थिनींनी सुबक व आकर्षक बाप्पाच्या मुर्त्या तयार केल्या.यातून ५ वी ची ऋतिका चंद्रकांत कोळी, ६ वी ची राजश्री राजेंद्र वाणी तर ७ वी च्या गटातुन हर्षिता शामकांत पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी,उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षीका एस.पी.बाविस्कर,
शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम,
क्रीडा शिक्षिका आर.एस.सोनवणे यांनी विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक केले.पर्यवेक्षक व कला शिक्षक डी.एम.दाभाडे यांनी यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन तसेच स्पर्धेचे यशस्वी परीक्षण केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button