Amalner

Amalner: अल्लामा फजले हक तर्फे समाजरत्न देऊन माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी सन्मानित..!

Amalner: अल्लामा फजले हक तर्फे समाजरत्न देऊन माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी सन्मानित..!

अमळनेर स्वातंत्र्य सेनानी अल्लामा फजले हक खैराबादी (रह.) स्टडी सेंटर & पब्लिक लायब्ररी अमळनेर या सामाजिक संस्थे मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय पातळीवरील मुशायरा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉल अमळनेर येथे संपन्न झाला.कार्यक्रमात अंमळनेर व जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांना ते करीत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक व राजकीय कार्याची दखल घेऊन समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यात पाडळसरे धरण समितीचे प्रवर्तक सुभाष चौधरी यांनाही गौरविण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवर 3 पंचवार्षिक नगरपरिषदेत मुस्लिम वाॅर्डातून मुस्लिम बांधवांनी त्यांना निवडून दिले.अर्बन बँकेत प्रचार न करता निवडून येण्याचा विक्रम यांच्या नावावर आहे.

नगरपरिषदेत बिनविरोध नगराध्यक्ष,अर्बन बँकेत बिनविरोध चेअरमन,शांतता कमिटीचे ज्येष्ठ सदस्य, पाडळसे धरणासाठी प्रचंड असे आंदोलन उभे केले,याची सरकारला दखल घ्यावी लागली होती. नगराध्यक्ष, नगरसेवक ,कापूस फेडरेशनचे प्रशासक,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय परिषद सदस्य, असे अनेक मोठे मोठे पदे त्यांना मिळाली त्या पदांना न्याय देत त्यांनी स्वच्छ प्रतिमा जपली आहे, वयाच्या ७२ व्या वर्षी सुद्धा ताट मानेने ते आज काम करत आहेत,आजच्या समाजात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून संस्थेचे पदाधिकारी तथा प्रमुख अतिथी यांचे उपस्थितीत सदर पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मुकतार खाटीक व मुस्लिम बांधव यांच्या हस्ते वितरित केले.
अल्लामा फजले हक खैराबादी संस्थेचे अध्यक्ष रियाज शेख यांनी या पुरस्काराबाबत प्रास्ताविक विशद केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगावचे सुप्रसिद्ध शायर साबीर मुस्तफा आबादी यांनी तसेच आभार एॅड.रज़्ज़ाक शेख यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button