Nashik

पोलिस मित्र समिती राज्य युवा अध्यक्ष ओमकार तासकर यांना सोशल अॅक्टिविटी व कृषी क्षेत्रातील नॅशनल एक्सलन्स अवॉर्डने सन्मान प्रदान,

पोलिस मित्र समिती राज्य युवा अध्यक्ष ओमकार तासकर यांना सोशल अॅक्टिविटी व कृषी क्षेत्रातील नॅशनल एक्सलन्स अवॉर्डने सन्मान प्रदान

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक- पोलिस मित्र समिती राज्य युवा अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी सतत शेतकरी हितासाठी लढणारे ओमकार तासकर यांना सोशल अॅक्टीविटी कृषी क्षेत्रातील नॅशनल एक्सलन्स अवाॅड नुकताच सन्मान पुर्वक देण्यात आला आहे कृषिप्रधान भारत देशामध्ये शेतामालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु विक्री व्यवस्थामध्ये शेतकरी लक्ष देत नाही व त्याचे अतोनात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालचे प्रतवारी, मूल्यवर्धन करून विक्री व्यवस्थावर भर द्यावा, शेती हाच सर्वोतपरि पर्याय भविष्यात ठरणार आहे. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने युवा वर्गाने देखील शेतीमध्ये येण्याचे गरज आहे. त्यासाठी शासनाच्या मॅग्नेट व स्मार्ट प्रकल्प त्यासाठी उपयोगी आहेत, त्यासाठी agristartup convention सारखे कार्यक्रम उपयोगी ठरतील” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडलचे उपसर व्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी केले. निमित्त होते कृषीभूषण महाराष्ट्र एफ. पी. ओ. स्टार्ट अप फेडरेशन आयोजित agri स्टार्ट अप convention २०२२ उद्योजगतानिर्मिती कार्यशाळा मध्ये ते बोलत होते.
दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी नाशिक येथील हॉटेल पंचवड प्राइड येथे agri स्टार्ट अप convention हा कार्यक्रम संपन्न झाला. शेतकरी व तरुणांमध्ये उद्योजकता निर्माण होण्यासाठी नाशिक मध्ये एक नाविन्यपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी सेवा केंद्र मधील व्यवसाय संधी शासकीय योजना या विषयावर फेडरेशनचे अध्यक्ष भूषण निकम यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातून २०० शेतकरी, उत्पादक कंपन्या, कृषि उद्योजक उपस्थित होते. या प्रशिक्षण साठी मनोज दंडगव्हाळ यांनी मार्केटिंग याविषयावर मार्गदर्शन केले तर, विवेक तांबोळी, योगेश बाहेती, अविनाश एखांडे, राहुल मोरे आदि मान्यवरांनी देखील शासकीय योजना, बँक लोन, बिझनेस प्लॅन याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते.
यामध्ये यशस्वी शेतकरी, कृषी विस्तारक व संशोधक तसेच कृषी उद्योजकांसाठी महाराष्ट्रातील २५ मान्यवरांना नॅशनल आयकॉन बिझनेस व एक्सलन्स पुरस्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी कृषि आयुक्त डॉ. पांडुरंग वाठाराकर, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळचे उपसर व्यवस्थापक चंद्रशेखर बारी, मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल क्वीन श्रीलंका डॉ. पूनम बिरारी, मनोज दंडगव्हाळ, अॅग्रोकेअर ग्रुपचे अध्यक्ष श्री. भुषण निकम, आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आदित्य तुपे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहिणी पाटील यांनी केले.
भूषण निकम यांनी कृषिभूषण अंतर्गत कामाची माहिती याठिकाणी दिली तसेच नवीन कृषि उद्योजक निर्मिती संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button