भारताचे स्वातंत्र्य अमृत महोत्सव सुरू असताना बँक ऑफ बडोदा शाखेला तिरंग्याचा लावणे व फडकवण्याचा विसर
सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यात जानोरी येथे केंद्र सरकारच्या वतीने शासनाने घोषित केलेल्या हर घर तिरंगा अभियान राबविण्याच्या सूचना दिल्ली पासून गल्लीपर्यंत राबविण्यात सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला विसर पडण्याचे काम मात्र जानोरी येथे असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखा यांना पडला असून सर्वसामान्य माणसाने मजुरी करणारा मजूर शेतकरी व्यापारी वाड्या वस्त्यांवर राहणारे विविध स्तरातील सर्व नागरिक यांनी शासनाने एक आव्हान केल्याप्रमाणे 25 रुपये ग्रामपंचायती किंवा शासकीय कार्यालयात भरणा करून
ध्वज उपलब्ध करून आपल्या देशाचा व आपल्या तिरंग्याचा स्वाभिमान द्विगुणित केला मात्र याच वेळी ज्यांच्याकडे गावाची आर्थिक नाडी म्हणून बघितले जाते अशा जानोरी येथील देना बँक नंतर आज बँक ऑफ बडोदा म्हणून विलीनीकरण झालेली ब्रांच असून या शाखेत जवळपास पाच ते सात कर्मचारी अ
आहे व शाखाधिकारी सह कर्मचारी यांना मात्र आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी होण्यात स्वारस्य नसल्याचे किंवा बँकेतील कुठलाही कर्मचारी गावात सुरू असलेल्या या अभियानादरम्यान आपल्या बँकेच्या इमारतीवर 25 रुपयाचा ध्वज सुद्धा आणून लावू शकले नाही त्यामुळे एक प्रकारे भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना बँकेला तिरंगा फडकवण्याचा गंधही नसल्याबाबत शेकडो नागरिकांच्या निदर्शनास आले किंवा असा काही उपक्रम गावामध्ये साजरा होतो आहे याचे कुठलेही प्रकारचे गांभीर्य संबंधितांना जाणवले नाही






