जिल्हा परिषद उर्दू शाळा केर्हाळे बुद्रुक ता. रावेर जिल्हा जळगाव येथे स्वातंत्र दिवस उत्साहात साजरा
(सावदा-प्रतिनिधी युसुफ शाह)
आज दिनांक 15 ऑगस्ट 2022 सोमवार रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळा केर्हाळे बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. ध्वजरोहण चे पवित्र कार्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय बाजीत मेहबूब तडवी यांच्या शुभहस्ते पार पडले. भारत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती शाळेचे उपशिक्षक शेख रफिक शेख गफफार यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमासाठी शाळेच्या पटांगणात केर्हाळे बुद्रुक च्या प्रथम नागरिक सन्माननीय दिपाली ताई लहासे, सरपंच उपसरपंच विनोद दादा पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक दादा पाटील, तडवी ऐनुरबाई , राजेंद्र दादा इंगळे , मा.चंद्रकांत दादा पाटील , कवीण भिल , मा.संजू पाटील , भूषण गायकवाड व सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्राम विकास अधिकारी माननीय एस टी पाटील साहेब , मा.शैलेश झोटे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद ,सावकारे मॅडम, रवींद्र तायडे सर, माजी पोलीस पाटील बापू पटेल गावातील नागरिक शाळेचे विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आमिन शाह , तडवी आरीफ ,रजजाक तडवी, छोटु पिंजारी, सुपडा बाई, रुबीना करीम तडवी, फरीदा फिरोज तडवी माजी पं.स.सदस्य जुगराबाई महबूब तडवी , मराबाई तडवी , हमीद तडवी, जाबीर तडवी आवर्जून उपस्थित होते सर्व उपस्थित त्यांच्या उपस्थितांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक गौसखान यांनी मानले.मुलांना मिठाई व खाऊ वाटप करण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदाने पार पडला.






