Nashik

नाशिक जिल्ह्यात भाजपा मार्फत होणार ६० हजार राष्ट्रध्वजाचे वितरण – ना डॉ. भारती पवारभारत सरकार आरोग्य राज्यमंत्री

नाशिक जिल्ह्यात भाजपा मार्फत होणार ६० हजार राष्ट्रध्वजाचे वितरण – ना डॉ. भारती पवारभारत सरकार आरोग्य राज्यमंत्री

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

नाशिक: दि १२ भारत यंदा स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करीत आहोत . पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. केंद्र शासनाकडून राष्ट्र ध्वज उपलब्ध करून दिले जात आहेत. परंतु प्रत्येक नागरिकाच्या घरी तिरंगा फडकावा या हेतूने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या माध्यमातून ६० हजार झेंडे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हे झेंडे प्रत्येक तालुक्यात भाजपा तालुकाअध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वितरण सुरु करण्यात आली असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष केदाजी नाना यांनी दिली आहे.
“हर घर तिरंगा” मोहीम म्हणजे आजादी का अमृत महोत्सवमधील महत्वाचा भाग आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभरामध्ये वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हा उत्सव १३ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होत आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. हर घर तिरंगा मोहिमेचा महत्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी आपआपल्या घरांवर तिरंगा फडकवावा या हेतूने सरकारने ही मोहीम सुरु केली असून या माध्यमातून देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आहे. तसेच या माध्यमातून भारतीय झेंड्यासंदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी अधिक अधिक लोकांना जाणून घ्याव्यात असा सुद्धा हेतू आहे. तशी जनजागृती कळवण तालुक्यात भाजपा पदाधिकारी यांचे माध्यमातून खाजगी शाळा, तसेच घरोघरी जाऊन जनजागृती करून राष्ट्रध्वजाचे वितरण सुरू केले आहे.

फोटो – झेंड्यांचे वाटप करतांना पदाधिकारी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button