Amalner

Amalner: महिलेवर अत्याचार…!नात्याला काळिमा फासणारी घटना…!विधवा भाऊजाई अत्याचारातून गरोदर…

Amalner: महिलेवर अत्याचार…!नात्याला काळिमा फासणारी घटना…!

अमळनेर येथील एका गावात जेठाने सख्या लहान भावाच्या विधवा पत्नीला मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अत्याचारातून पिडीता गरोदर राहिली असून तिच्या तक्रारीनुसार बुधवार, मारवड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पिडीतेला आधार नसल्याने जळगाव येथील शासकीय आशादीप वसतीगृहात दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार साधारण सहा-सात महिन्यापूर्वी येथे तिचा जेठाने सासरी असतांना तुझ्या मुलाला मारुन टाकेल अशी धमकी देत इच्छेविरुध्द पिडीतेसोबत शारिरीक संबध प्रस्थापित केले. यामुळे त्याच्यापासुन पिडीता गरोदर राहिली. एवढेच नाहीतर सासु, सासरे जेठाणी यांनी पीडीतेच्या पोटावर हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत छळ केला. या प्रकरणी पिडीताने धुळे शहर पोलिसात फिर्याद दिली होती. शून्य क्रमाकने तो गुन्हा बुधवारी पिडीतेचा जेठ तसेच जेठाणी, सासू व सासरे यांच्या विरोधात मारवड पोलिसात दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करत असून पीडितेला आधार नसल्यामुळे तिला जळगावच्या आशादीप महिला संरक्षण केंद्रात ठेवण्यात आले. संशयित जेठ गोपाल भोई याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button