Chandwad

चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालेवस्ती येथे चिमुकल्यांनी दिला हर घर तिरंगाचा संदेश

चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालेवस्ती येथे चिमुकल्यांनी दिला हर घर तिरंगाचा संदेश

उदय वायकोळे चांदवड

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या निमित्ताने हर घर तिरंगा या अभियानाच्या प्रसारासाठी व जनजागृती करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालेवस्ती येथील शाळेतील चिमुकल्यांनी अशाच प्रकारे हर घर तिरंगा हया अभियानात गावातील सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रभातफेरी काढून जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत परिसरात चैतन्य निर्माण केले. तसेच प्रभातफेरीनंतर शाळेच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री महाले सरांनी उपस्थितांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यासंबधी राबविण्यात आलेल्या व राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संदीप महाले , उपाध्यक्षा सौ. उज्वला ठाकरे तसेच समितीचे इतर सदस्य, मुख्याध्यापक श्री बाळू महाले सर,माता पालक संघ, शिक्षक पालक संघ यांचे सदस्य तसेच उपशिक्षक श्री प्रफुल्ल सोनवणे सर, व गावातील नागरीक तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button