जनता इंग्लिश स्कूलमध्ये गुरुशिष्य कर्मवीर काकासाहेब वाघ व माधवराव बोरस्ते स्मृतिदिन साजरा
दिंडोरी सुनील घुमरे
जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी येथे गुरुशिष्य कर्मवीर का॰ कासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य रमेश वडजे होते. यावेळी प्राचार्य रमेश वडजे, उपप्रचार्य सोपान वाटपाडे, पर्यवेक्षक जी. व्ही. अंभोरे, आर. व्ही. मोकळ, एन. पी. चौधरी यांच्या हस्ते कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या प्रतिमेचे पूजन केले.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी स्मृती भामरे व आर्या पगारे यांनी सूत्रसंचालन केले.
कु. सोहम सोनवणे याने मनोगत व्यक्त केले.उपशिक्षिका एल एन उगले यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्ष मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य रमेश वडजे यांनी विध्यार्थ्यांना कर्मवीरांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान विषयी माहिती सांगितली.व कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी बहुजन समाजासाठी केलेले कार्य ,शेतकऱ्यांना हमी भाव, नाशिक महानगरपालिकेच्या इमारतीचे नुकसान स्वीकारून केलेले 1 रुपयात बांधकाम, नाशिक ,पिंपळगाव, सटाणा येथील कॉलेजसाठी परवानगी, दिंडोरी नाशिक रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी प्राप्त करून घेतली आणि आज झालेला विकास ही त्यांच्या कार्याची पावती आहे तसेच सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांनी दिलेले सहकारातील मोठे योगदान आणि खाजगी तंत्रशिक्षणाची ज्ञानगंगा जिल्ह्यामध्ये प्रथम आणण्याचे कार्य त्यांनी केले*
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीम व्ही बी शिंदे यांनी मानले.
फोटो- दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते स्मृतिदिन कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक आदी






