प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिले ३ अपत्य प्रकरणी महिला उ.शिक्षक बाबत रावेर बिडीओ यांना विना विलंब चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश!
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- रावेर येथे जि.प.उर्दु शाळा क्र.१ मध्यील महिला उपशिक्षक गजाला तबस्सुम विद्यादान करण्याच्या क्षेत्रात कार्यरत असूनही त्यांनी स्वतःला तिन अपत्ये असल्याची माहिती जाणीवपूर्वक की काय?लपवून अप्रमाणीकरित्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी स्वतःला रावेर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी शैलेश दखणे यांच्या मदतीने पात्र ठरवून घेतले.सबब हा गंभीर प्रकार दि.९ सप्टेंबर २०२१ रोजी रावेर पंचायत समितीच्या आडवा बैठकीत काही जागृत सदस्यांमुळे प्रकाश झोतात आला होता.तरी या बैठकीत गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांनी माफी देखील मागितली होती.
यानंतर संशयाच्या भौऱ्यात सापडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव व महिला उपशिक्षक गजाला तबस्सुम यास तीन अपत्य असल्याबद्दल सावदा ता.रावेर येथील जागृत नागरिक शेख फरीद शेख नुरोद्दीन वगैरे यांनी रावेर पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी ते जिल्हा परिषद जळगांव इथपर्यंत वेळोवेळी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित शिक्षण विभागाचे अधिकारी विकास एम पाटील यांना वारंवार समक्ष भेटून कारवाईबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत गटविकास अधिकारी रावेर यांना सध्याचे पाठवलेल्या स्मरण पत्रात असे म्हटले आहे की,सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपणास चौकशी करून अहवाल सादर करणेबाबत दि.११ जानेवारी २०२२ रोजी लेखी पत्र द्वारे कळविण्यात आलेले आहे. तथापि प्रस्तुत प्रकरणी अद्याप पावतो चौकशी करून अहवाल या कार्यालयास सादर केलेला नाही तसेच संबंधित तक्रारदार सदर बाबत वारंवार या कार्यालयास तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत तगादा करीत आहे तरी आपणास या स्मरणपत्राद्वारे पुनश्च कळवण्यात येते की तक्रारदार यांचे मूळ अर्जानुसार प्रस्तुत प्रकरणी सखोल चौकशी करून आवश्यक कागदपत्रे व पुरावेसह या कार्यालयास आपल्या सवयस्पष्ट अभिप्रायसह चौकशी अहवाल सादर करणेत यावा.विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.विलंब झाल्यास किंवा संबंधित तक्रारदार यांनी वरिष्ठ कार्यालयास तक्रार दाखल केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची गंभीर्याने नोंद घ्यावी असे गटशिक्षण गटविकास अधिकारी पंचायत समिती रावेर यांना सध्याचे पाठवलेल्या विस्मरणपत्रात असे निर्देश दिलेले आहे.
तरी प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प.जळगांव विकास एम पाटील यांनी सदर तक्रारीच्या अनुषंगाने स्मरणपत्राद्वारे दिलेल्या निर्देश रावेर गट विकास अधिकारी किती गंभीरता पूर्वक घईल याकडे तक्रारदारांसह सर्वांचे लक्ष लागून आहे.






