मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद यांच्यावतीने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्या संदर्भात नंदुरबार पोलीसांना मार्गदर्शन
नंदुरबार/फहिम शेख
26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येत असतो, त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांनी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 15 दिवस जनजागृती मोहिम राबवावी असे नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांना कळविले होते.त्या अनुषंगाने आज दिनांक 15/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथील संवाद हॉल येथे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद या सेवाभावी संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पंधरवाड्यानिमित्त “राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिका-यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद या सेवाभावी संस्थेचे राज्य प्रकल्प अधिकारी श्रीमती झिया शेख, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे यांनी विभागीय व्यवस्थापक श्री. अभिजीत संघई, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक श्री. आत्माराम प्रधान यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे अति. जिल्हा शल्य चिकित्सक श्री. कांतराव सातपुते, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्री. हरीशचंद्र कोकणी यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
सदर कार्यशाळेला उपस्थित पोलीस अधिका-यांना मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद या सेवाभावी संस्थेचे नंदुरबार जिल्हा सल्लागार डॉ. श्री. कल्पेश चव्हाण यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा 2003 च्या प्रभावी अमंलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद या सेवाभावी संस्थेचे राज्य प्रकल्प अधिकारी श्रीमती झिया शेख यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याचे कलम 4 अन्वये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यास त्याबाबत शिक्षा व कलम 6 अन्वये 18 वर्षाखालील व्यक्तिना तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास व शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड
परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री व शिक्षा याबाबत तसेच सदर कायद्यांतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांबाबत देखील मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यानं त्याचे स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम व आजार याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.गोविंद चौधरी यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर केली जाणाऱ्या कारवाईबाबत नेमण्यात आलेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी यांची माहिती देवून कारवाई कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेसाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. श्री. गोविंद चौधरी, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्री. हरीशचंद्र कोकणी नंदुरबार जिल्हा सल्लागार डॉ. श्री. कल्पेश चव्हाण, नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे अति. जिल्हा शल्य चिकित्सक श्री. कांतराव सातपुते, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. श्री. शिवाजी राठोड, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक श्री. आत्माराम प्रधान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद या सेवाभावी संस्थेचे राज्य प्रकल्प अधिकारी श्रीमती झिया शेख, विभागीय व्यवस्थापक श्री. अभिजीत संघई इत्यादी उपस्थित होते.






