Faijpur

प्रा.डॉ.विजय सोनजे यांची गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी तर प्रा.डॉ.ताराचंद सावसाकडे यांची स्वीकृत सदस्य पदी निवड.

प्रा.डॉ.विजय सोनजे यांची गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी तर प्रा.डॉ.ताराचंद सावसाकडे यांची स्वीकृत सदस्य पदी निवड.

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

उच्च शिक्षण क्षेत्रात अतिशय परखड भूमिका मांडणारी संघटना, प्राध्यापकांच्या तसेच उच्च शिक्षण क्षेत्राच्या विकासत राज्य व केंद्र शासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करने व देशातील विद्यापीठांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत जबाबदारीने भूमिका मांडने देशभरात बुद्धिजीवी प्राध्यापकांची संघटना म्हणुन ओळखली जाणारी सर्वात मोठी संघटना म्हणून नावलौकिक असलेली “ऑल इंडिया फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायजेशन” (AIFUCTO) शी सल्लग्न असलेली NMUCTO “नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हरसीटी अँड कॉलेज टिचर्स ऑर्गनाईजेशन” च्या केंद्रीय कार्यकारणीत धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर येथील प्रा. डॉ.विजय सोनजे यांची गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी व डॉ.ताराचंद सवसाकडे यांची स्वीकृत सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून प्राचार्य डॉ.मनोहर पाटील यांनी काम पाहिले.
या नियुक्ती बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी,उप प्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे, उप प्राचार्य डॉ.उदय जगताप,उप प्राचार्य प्रा.डी.बी. तायडे,संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी, MFUCTO चे पदाधिकारी डॉ. संजय सोनवने,NMUCTO वरिष्ठ पदाधिकारी डॉ.अनिल पाटील,डॉ. ई. जी.नेहते,डॉ.जितेंद्र तलवारे, डॉ.के.जी.कोल्हे व संघटनेचे इतर सर्व पदाधिकारी,महविद्यालय व तापी परिसर विद्या मंडळ,फैजपूर संस्थेचे पदाधिकारी व स्थानिक शाखेचे सदस्य व सर्व सहकारी प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button