हेमंत चौधरी यांचा चित्रपट बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदर्शित
फैजपूर प्रतिनिधी सलीप पिंजारी तालुका यावल
फैजपूर परिसरातील दुसखेडा येथील रहिवासी हेमंत चौधरी यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बहुमान मिळाला आहे, दक्षिण कोरिया येथील बुसान शहरात आजपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हेमंत अनिल चौधरी यांनी निर्मित केलेला “लास्ट फिल्म शो” या चित्रपटाला ओपनिंग फिल्म चा बहुमान मिळाला असून त्या चित्रपटाचे आज प्रदर्शन झाले आहे.
हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आठ जुलै ते 17 जुलै दरम्यान आयोजित केलेला असून या महोत्सवात जगभरातील 75 देशातील 180 फिल्म ची स्क्रीनिंग साठी निवड झालेली आहे.
या महोत्सवाच्या ओपनिंग फिल्म चा बहुमान खानदेश चे सुपुत्र हेमंत अनिल चौधरी यांच्या लास्ट फिल्म शो या चित्रपटाला मिळाला असून आज त्याचे स्क्रीनिंग यशस्वीरित्या पार पडले आहे हा आपल्या संपूर्ण मराठी माणसांसाठी अतिशय आनंददायी क्षण आहे. हेमंत अनिल चौधरी मुळचे खिरोदा येथील रहिवासी असून सध्या ते मालाड मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या फिल्मचे दिग्दर्शन श्री पान नलीन यांनी केलेले आहे या चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड झालेल्याचे पत्र त्यांना महिन्याभरापूर्वीच मिळाले होते व ते सात जुलैला दक्षिण कोरिया साठी रवाना झाले.
हेमंत अनिल चौधरी हे विंध्य पेपर मिल दुसखेडाचे माजी फॅक्टरी मॅनेजर कै. अनिल चावदस चौधरी यांचे सुपुत्र असून भुसावळ येथील प्रतिष्ठित नागरिक हरीष फालक यांचे भाचे आहेत.
त्यांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.






