नंदुरबार R.T.O. कार्यालयात बोगस वाहन नोंदणी प्रकरणात R.T.O. किरण बिडकर, R.T.O. उत्तम जाधव, कांतीलाल अहिरे व जयसिंग चुडामण बागुल यांचीही सखोल चौकशी होऊन कार्रवाई होणे कामी.
नंदुरबार/फहिम शेख
या निवेदन द्वारे आम्ही आपणास कडवू इच्छित आहोत की, नंदुरबार R.T.O. कार्यालय व त्यांतर्गत असलेले बेड्कीपाडा व गाव्हाली तपासनी नाका नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहिले आहे.जानेवारी 2022 पासुन ते फिर्याद दाखल झाली तो पर्यंत बोगस रित्या नोंदणी झालेले 83 विविध वाहनांचे मालक तसेच औरंगाबाद येथील एजेंट सलीम खान व तळोदा जि. नंदुरबार येथील एजंट इम्रान सैय्यद तसेच इतर एजंट व संबंधित व्यक्ती विरुद्ध जयसिंग चुडामण बागुल वय. 37, धंदा R.T.O. कार्यालय नंदुरबार येथे नोकरी, रा.प्लॉट नं. 18, स्वामी समर्थ नगर, नंदुरबार यांच्या फिर्यादीवर नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 28-06-2022 रोजी गु.र.नं. 395/2022, भा.दं.वी. कलम 420, 465, 467, 468, 120(B), 34 सह माहिती तंत्रज्ञान अधि.66, 66(C) अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला. सदर फिर्यादीत बागुल यांच्या म्हणण्यानुसार वरील इसमांनी संगनमत करून बागुल यांचे वरिष्ठ कांतीलाल अहिरे व त्यांचे युजर आय डी हॅक करून जानेवारी 2022 ते फिर्याद दाखल झाल्या दिवस पर्यंत एकुण 83 विविध मॉडेलच्या गाड्यांना शासनाला कोणतेही टॅक्स ना भरता अवैधरित्या रजिस्टर केले तसेच आर सी बुकचे ही बनावटीकरण करून शासनाचे अंदाजित 66,59,900/- रुपयाची फसवणूक केली.आमचे आरोप असे आहे कि, मागील सहा महिन्यापासून जर वरील जबाबदार अधिकान्यांचे युजर आय डी हॅक होऊन सदर प्रकार सुरु होते आणि एवड्या प्रचंड वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले तो पर्यंत यांना समजले कसे नाही ? R.T.O. श्री. किरण बिडकर म्हणतात कि या कार्यालयाला माहिती प्राप्त झाली कि जे नंबर या कार्यालयने जारी केले नाही असे नंबरचे बोलेरो पिकअप वाहन क्र. MH39-C-0123 हीअक्कलकुआ येथे वापरण्यात येत आहे. म्हणजे बाहेरहून माहिती मिळाली तेंव्हा संबंधित कार्याल्यातील
अधिकार्यांना जाग आली? तोपर्यंत एवडे जबाबदार अधिकारी हे झोपा काढत होते का ? ही बाब आय टी ची थोडीफार माहिती असणार्या माणसालाही ना पटणारी असुन, दर रोज संगणकावर बसून एकच युजर आय डी व पासवर्ड ने काम करणाऱ्या जबाबदार अधिकार्यांना कसी समजली नाही कि आपल्या युजर आय डी चा गैर वापर होऊन आपल्या व्यतिरिक्त इतर कोणी अज्ञात व्यक्ती गैरकृत्य करत आहे ? साध्या फेसबुक किंवा गुगल अकाऊंट हे आपण आपले डीवाईस व्यतिरिक्त इतर डीवाईस मध्ये सुरु करतांना त्वरीत आपल्याला आपल्या डीवाईस वर अलर्ट मेसज येऊन जाते, तब्बल सहा महिने वरील महाशयांचे डीवाईस वर कुठलेही असे मेसज आले नाही ? हकीकत अशी कि, वरील भ्रष्टाचारात कुठे ना कुठे वरील अधिकारी हो गुंतलेले असुन जो पर्यंत तेरी भी चूप मेरी भी चूप सुरु होता तो पर्यंत मिळुन वाटुन खाल्लं, जेंव्हा बाहेरून समजले कि चोरी पकड़ी गई तेंव्हा आपले कॉलर वाचवण्यासाठी अगोदर एजंटांना पसार करण्यात आले व नंतर स्वतः फिर्यादी होऊन एजंटांना बलीचा बकरा करून फिर्याद देण्यात आली आहे. सदर प्रकरणात R.T.O. किरण बिडकर, R.T.O. उत्तम जाधव, कांतीलाल अहिरे व जयसिंग चुडामण बागुल यांनाही आरोपी करून जोपर्यंत वरील बाबींची सखोल चौकशी होऊन खरे खोटे निष्पन्न होत नाही तोपर्यंत यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे ज्याने कार्यालयातील पुरावे व साक्षीदार हे सुरक्षित राहतील. ही विनंती. असा निवेदन राष्ट्रीय विश्गामी पत्रकार संघाचा वतीने उप जिल्हाधिकारी सुधीर खांदे व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार यांना देण्यात आले आहे






