Rawer

तापी पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मागण्या

तापी पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मागण्या

निभोरा ता रावेर संदिप कोळी

वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून गणले गेले आहे. समाज व देश बळकट करण्याचे काम खऱ्या अर्थाने हा स्तंभ करीत असतो. परंतू या स्तंभाचा पाया जर मजबूत असेल तर त्याचे कार्य सुरळीत चालू शकते. आणि हाच पाया आहे वृत्तपत्र विक्रेते बांधव. वृत्तपत्र विक्रेते बांधवांच्या अथक परिश्रमावर वृत्तपत्र व्यवसायाचा डोलारा वर्षानुवर्षापासून तग धरून उभा आहे.
पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोणी सायकलवरून तर कोणी चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करीत असतो. वृत्तपत्र विक्रेता दररोज न चुकता नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाची पर्वा न करता आपल्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम हा विक्रेेेता अविरपणे करत आहेत. या विक्रेत्यांच्या छोट्या – मोठ्या मागण्या सोडाव्यात त्यासाठी तापी पूूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटना प्रयत्न करीत आहे. या संघनेच्या विमा कवच आरोग्य आणि अपघात विमा सुविधा मिळाव्यात. महागाईचा विचार करुन आधारभुत कमिशन मिळावे. डिपॉझीट रक्कम वर व्याज मिळाव. अशा मागण्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या असूूून संघटनेच्या माध्यमातून पेेेपर कंपन्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी लोकमत कार्यालय, दिव्य मराठी कार्यालय, सकाळ कार्यालय, पुण्य नगरी कार्यालय व देशदूत कार्यालय या कार्याल यांना भेट देऊन निवेदन देतांना महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संंघटना जळगाव उपाध्ययक्ष गोपाल चौधरी, तापी पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संंघटना अध्यक्ष संजय निंंबाळकर वरणगाव, संघटना सचिव गणेश पाटील उटखेडा, सदस्य प्रल्हाद महाजन बलवाडी, कमलाकर माळी मोठे वाघोदा, विनोद सैतवाल चिनावल, नितिन बाणाईत सांगवी, महेश वाणी यावल, सुनिल सोनी जामनेर, उज्वल मराठे तळवेल, श्रीकांत कुलकर्णी भुसावळ, अमोल साबळेे भुसावळ, अजिंक्य वाणी रावेर, विकास पाटील सावदा, प्रमोद पाटील सावखेडा आदी उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button