मोठा वाघोदा ग्रामपंचायती तर्फे ७३:अपंग लाभार्थ्यांना १००० प्रमाणे अनुदान वाटप
रावेर/ मुबारक तडवी
ग्रामपंचायत ग्रामनिधीतुन ५% वैयक्तिक लाभ म्हणून ७३: अपंग बांधवांना प्रती अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी १०००/(एक हजार) प्रमाणे ७३ लाभार्थ्यांना धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले यापैकी काही अपंग लाभार्थ्यांनी आपल्या कडील घरपट्टी पाणीपट्टी मिळकत कर थकबाकीत भरणा करुन लाभ घेतला तर ज्या लाभार्थ्यांकडे घर नाही त्यांना धनादेशाचे चेक देण्यात आले यावेळी सरपंच मुबारक ( राजू) अलिखा तडवी ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी सदस्य नितीन किसन सुपे, संजय काशिनाथ माळी भुषण बाळू चौधरी उदय प्रभाकर पाटील, हाजराबी करीम पिंजारी प्रमिलाबाई युवराज भालेराव अमिनाबाई सुभान तडवी हर्षा विशाल पाटील मिनाक्षी हर्षल पाटील साधनाबाई निळकंठ महाजन भाग्यश्री बाळू वाघ संगिता स्वप्निल पवार सुमनबाई शंकर कापसे क्लार्क प्रकाश वायके पंकज मालखेडे सुनिल पाटील राहुल महाजन अजय कराड भुषण नेहते आदी कर्मचाऱ्यांसह गावातील अपंग लाभार्थी महिला पुरुष मुले मुली उपस्थित होते