Nashik

गुंजाळ यांच्या प्रयत्नानां यश आमदार हिरामण खोसकर यांच्या माध्यमातून तळोशी गावाला ९२ लाख रुपयाची नळपाणी पुरवठा योजना मंजूर

गुंजाळ यांच्या प्रयत्नानां यश
आमदार हिरामण खोसकर यांच्या माध्यमातून तळोशी गावाला ९२ लाख रुपयाची नळपाणी पुरवठा योजना मंजूर

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक= काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांच्या प्रयत्नातुन आमदार हिरामण खोसकर यांनी तळोशी, ता.ईगतपुरी येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे दिलेले आश्वासन पुर्ण केले असुन गावासाठी तब्बल ९२ लक्ष, ७७ हजार, ३७५ रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. ही माहिती गुंजाळ यांनी दिली असुन आ.खोसकर यांचे गावाचे वतीने आभार ही मानले आहे.
सन १९९० मध्ये तळोशी गावात कार्यान्वित झालेली नळपाणी पुरवठा योजना तब्बल तीस वर्षाची जीर्ण झालेली आहे. शिवाय तीस वर्षात गावची लोकसंख्या ही वाढली असुन या वाढत्या लोकसंख्येच्या पाश्वर्भुमीवर ही योजना गावासाठी अपुरी पडत होती. त्यामुळे महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत होते.
दरम्यान गुंजाळ यांच्या सह गावातील नागरिकांनी ही व्यथा आ.खोसकर यांच्या पुढे मांडल्यानंतर त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनाची पुर्तता करत आ.खोसकर यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे दिशेने या पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देऊन पाऊल उचलले आहे.
या बाबत तळोशी ग्रामस्थांनी आ.खोसकर यांचे आभार मानले आहे.
दरम्यान तळोशी सह ईगतपुरी तालुक्यातील धार्नोली व मोगरे या दोन गावासाठी ही आ.खोसकर यांनी नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे.
आश्वासनाची पुर्तता, नागरिकांमध्ये समाधान
तळोशी गावासाठी आ.खोसकर यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अखेर नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली असुन गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button