Bollywood

Mollywood: आता खा.अमोल कोल्हे दिसतील नथुराम गोडसे च्या भूमिकेत..!राजकिय वर्तुळात वाद,खळबळ आणि टीका..!

आता खा.अमोल कोल्हे दिसतील नथुराम गोडसे च्या भूमिकेत..!राजकिय वर्तुळात वाद,खळबळ आणि टीका..!

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे लवकरच मोठ्या पडद्यावर नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण त्यांच्या या नव्या चित्रपटावरुनच एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट 30 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात काम करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. अमोल कोल्हे यांच्या या चित्रपटावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी विरोध केला आहे.ह्या प्रोमो मुळे राजीकय वातावरण तापलं असून जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान अमोल कोल्हे यांनी काही खुलासे केले आहेत. त्यांच्या मते काही घटनांशी आपली 100 टक्के वैचारिक सहमती असते. तर काही भूमिकांशी वैचारिक सहमती नसते. तरी सुद्धा ती भूमिका आव्हानात्मक वाटते. मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये जे लिहिलं आहे त्याशी मी शंभर टक्के सहमत आहे. मी 2017 साली त्या चित्रपटात काम केलं आहे. हा चित्रपट आता रिलिज होतोय. या मधल्या काळात आता बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. मी नथ्थूराम गोडसेच्या उदात्तीकरणाची भूमिका कधीच घेतलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणाला कलाकार म्हणून ही भूमिका मांडायची असेल कलाकार म्हणून मी काम केलेलं आहे. यामध्ये कोणतीही गोष्ट नाकारण्याचं किंवा लपविण्याचं कोणतंही कारण नाही हे मला प्रामाणिकपणे वाटतं. व्यक्ती म्हणून मला विचार स्वातंत्र्य आहे आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या दोन्हींची गल्लत होऊ नये, अशीच माझी अपेक्षा आहे.

“मी गांधीजींचा वध केला. मी त्या कार्यक्रमाची वीर सावरकरांना जराही माहिती दिली नाही. अमानुषपणे झालेल्या या विभाजनात दीड कोटी लोक बेघर झाले आहेत आणि लाखोंनी आपला जीव गमावला आहे”, असे वाक्य अमोल कोल्हे या टीझरमध्ये बोलताना दिसत आहेत. “पाकिस्तानात हिंदू जात आणि संस्कृतीला मिटविण्यासाठी जे अत्याचार होत आहेत त्याचं मुळ कारण गांधीच आहेत”असंही अमोल कोल्हे या चित्रपटात म्हणताना दिसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button