Nashik

दिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी तीन अर्ज दाखल 

दिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी तीन अर्ज दाखल

सुनिल घुमरे नाशिक विभागीयप्रतिनिधी
। दिंडोरी

दिंडोरी नगरपंचायत निवडणूकीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, आज अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक 11 मध्ये माधुरी श्रीकांत साळुंखे यांनी राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी व अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर प्रभाग क्रमांक 16 मध्ये गणेश बोरस्ते यांनी राष्ट्रीय कोंग्रेस पक्षाकडुन अर्ज दाखल केला आहे.

दिंडोरी नगरपंचायत चे 17 प्रभाग आहे , त्यापैकि प्रभाग क्रमांक 17 मधून सुजीत मुरकुटे हे अविरोध निवडून आले, तर 14 प्रभागामध्ये 21 डिसेंबर रोजी मतदान झाले होते, आता दोन प्रभागमध्ये निवडणूक होत आहे. अर्ज भरण्यासाठी कमी वेळ मिळणार असल्याने कागदपत्र जमवाजमव करण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू असून शासकीय कर भरणा करत दाखले मिळविण्यासाठी इच्छुकांनी नगरपंचायत कार्यालयात गर्दी केली होती. निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते राजकीय व्यूहरचना आखत आहे. शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी, भाजप ने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे, मनसे ही काही जागा लढवणार आहे.स्वबळा सोबतच आघाडीच्या चर्चाही सुरू आहे.

फोटो

दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना सौ माधुरी श्रीकांत साळुंखे,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button