Amalner:सायकल मार्ट चालविणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..!
अमळनेर येथे पान खिडकी परिसरात राहणारा व कृषी उत्पन्न बाजार समिती च्या समोर वॉशिंग सेंटर चालविणाऱ्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि 27 डिसेंबर रोजी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सचिन भावसार (वय 33) रा पान खिडकी अमळनेर हा तरुण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर सचिन सायकल मार्ट व वॉशिंग सेन्टर चालवत होता. हेच त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते.दि 27
डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 10 च्या कालावधीत वाशिंग सेंटरच्या खोलीमध्ये ह्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.सचिनच्या नातेवाईकाने खोली उघडुन पाहिली असता सचिनने गळफास घेतल्याचे दिसून आले. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉ नी सचिन ला मृत घोषित केले . पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बापू साळुखे करत आहे.






