आरोग्याचा मुलमंत्र..स्ट्रेच मार्क्स वर घरगुती उपाय
जेव्हा तुमची त्वचा ताणली जाते त्या ठिकाणी त्वचेचं कोलेजन कमी होतं, त्यामुळे त्याचं जनरल प्रॉडक्शन सायकल खराब होतं आणि त्वचेला नुकसान पोहचतं. यामुळए तुमच्या त्वचेवर खालच्या बाजूला स्कार्स अर्थात निशाणी यायला लागते. सुरुवातीला हे गुलाबी अथवा लाल रंगाचे असतात आणि नंतर काही काळाने हे स्ट्रेच मार्क्स तुम्हाला चंदेरी अथवा पांढऱ्या रंगाच्या लाईनमध्ये दिसतात. तुमची त्वचा जर आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खेचली गेली तर अशा प्रकारचे निशाण दिसू लागतात, ज्याला स्ट्रेच मार्क्स असं म्हटलं जातं.
कोरफड:-
स्ट्रेचमार्क्सवर कोरफडीचा गर नियमित लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने सारा भाग स्वच्छ करा. सलग काही आठवडे हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास दूर होईल.
कॉफी आणि कोरफड पॅक:-
कॉफी आणि कोरफडीचा गर एकत्र मिसळा. हा पॅक स्ट्रेच मार्कवर लावा. 15-20 मिनिटांनी हा पॅक पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर मॉईश्चरायझर क्रिम लावा. महिनाभार हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सच्या त्रासातून तुमची सुटका होऊ शकते.
कोको बटर :-
कोको बटर त्वचेसाठी खूपच हायड्रेटिंग आणि पोषक असतं. सुरकुत्यादेखील त्वचेपासून दूर ठेवतं. स्ट्रेच मार्क्सवाल्या भागावर रोज दिवसातून दोन वेळा कोको बटरने मसाज करा. 1-2 महिन्यात तुम्हाला फरक दिसून येईल.
डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )






