Amalner

Amalner: चला वं बहिनस्व खान्देश अहिराणी कस्तुरी महोत्सव ले जानं शे..!करा ते लवकर तयारी..देखा कालदिन पाई कार्यक्रम शे बरं का.!

Amalner: चला वं बहिनस्व खान्देश अहिराणी कस्तुरी महोत्सव ले जानं शे..!करा ते लवकर तयारी..देखा कालदिन पाई कार्यक्रम शे बरं का.!

दि. २५ आणि २६ डिसेंबरला ६ व्या राज्यस्तरीय खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंच अमळनेर शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आलेले आहे.

महोत्सववातील विविध स्पर्धेतील विजेत्यां महिला व मुलींना खान्देश सौंदर्यसम्राज्ञीचा मानाचा मुकुट, सोन्याची नथ, पैठणी व सर्व सहभागीनां सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून यासाठी अनेक खान्देशी अभिनेते,अभिनेत्री व कलाकारांची उपस्थिती राहणार आहे.
२५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता उदघाट्न सोहळा उदधाटक जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महोत्सव अध्यक्ष सुभाष अहिरे, उदघाटक सोहळाचे अध्यक्ष म्हणून अमळनेर नगराध्यक्षा मा.
पुप्षलताताई साहेबराव पाटील , मा.आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील , रवागताध्यक्ष लेफ्ट.डॉ. जितेंद्र देसले.माजी आमदार श्री.शिरीश चौधरी हे असतील तर प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध खान्देशी आभिनेता शाम राजपुत,सुप्रसिद्ध वर्दितला कलाकार संघपाल तायडे, सु.खान्देशी कलाकार सचिन कुमावत, तसेच शहरातील सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर इ. उपस्थिती असणार आहेत.
महोत्सवात मान्यवरांचे हस्ते सामाजिक , साहित्य कला सांस्कृतिक , शैक्षणिक असे विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.अशी माहिती मंचच्या राज्यअध्यक्षा विजया मानमोडे, जळगाव जिल्हाध्यक्षा मोहिनी पाटील , अमळनेर शहर अध्यक्षा शितल सावंत आणि अमळनेर संघटक ॲडव्होकेट मिनाक्षी साळुखे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे माहिती दिली आहे.
खान्देश महोत्सवात दुपार सत्रात २ ते ३ वाजता ‘ अहिराणी दिन आणि खान्देश गौरव दिन साजरा होण्या बाबतच्या चर्चासत्राच्या अध्यक्षा अहिराणी स्री लोकगीताचे गाढे अभ्यासक डॉ.उषा सावंत आहेत.जेष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. सदाशिव
सुर्यवंशी , डॉ. प्रविण माळी, लेफ्ट.डॉ.जितेंद्र देसले, मा. सुरेशनाना पाटील आणि मा. सुभाष अहिरे यांचा सहभाग असणार आहे.
सदर महोत्सवात अहिराणी कवी संमेलन हि होणार असून सायंकाळी गोकुळ पाटील आणि समिर के.एस प्रस्तुत ‘जागर अहिराणी माय ना’ हा खान्देशी लोकगीत संगीत-नृत्याचा कार्यक्रम असेल दि.२६ डिसेंबरला खान्देशी महिलांच्या कलागुणांना भव्य व्यासपिठ मिळावे व पुढे त्यांना राज्यस्तरीय आपले कलागुण
कौशल्य सादर करता यावे यासाठी ‘खान्देश विभागीय सौंदर्यसम्राज्ञी’ ही प्रतियोगिता होणार आहे.या स्पर्धेचा उद्देश मराठीबोलिभाषा संवर्धन व साहित्य कला, वस्र संस्कृतीचा प्रचार प्रसार असा असून सदर स्पर्धेत जास्तीत जास्त अहिराणी व मराठीला प्राधान्य देनण्यात येईल.विशेषतः अहिराणी गाण्यावर होणारा स्पेशल रम्पवाक आकर्षक ठरेल.यासाठी मयुरेश महाजन हे गृमिंग ट्रेनर म्हणून स्पर्धापूर्व प्रशिक्षण देत आहे. सकाळी १० ते १२.३० पर्यंत कलागुण कौशल्य फेरी होणार. ज्यामध्ये महिला व मुली आपले विविध कलागुण सादर करतील.
दुपारी उपस्थित प्रेक्षकांसाठी ‘खेय वूत अहिराणीमां आणि होवूत मानकरी नऊवारी, पैठाणीनां’ याचे सुत्रधार श्री. विलास शिरसाठ हे सुप्रसिद्ध खान्देशी कलाकार असणार आहेत. दुपारी ते ७ पर्यंत सदर प्रतियोगिताचे उर्वरीत सत्रात पारंपारिक
वेषभुषेत रम्पवाक सोबत विविध फेरीत आपले कौशल्य सादर करावे लागेल.

महोत्सवात खान्देशातील मान्यवर पाहुणे तसेच शांताबाई फेम अभिनेत्री राधिका पाटील उपस्थित राहणार आहेत. परिक्षक म्हणून डॉ. दिपाली आचार्य , नागसेन पेंढारकर , अभिजित मानमोडे असतील. नितिन म्हस्के व विलास शिरसाठ हे
कलाकार सुत्रसंचालन करणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीच्या महिला कार्यकर्त्या परिश्रम घेत असून आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, प्रा.लिलाधर पाटील तसेच महेंद्र महाजन आदींचे सहकार्य लाभत आहेत.
मंचातर्फे जाहीर करण्यात आलेले विविध पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे आहे अ.भा.खान्देश कोहिनूर गौरव-मा.डॉ. दिनेश पाटील, जीवन गौरव-मा.सौ.तिल्लोत्तमा पाटील, खान्देश रत्न-मा. कृषीभुषण साहेबराव पाटील, मा.डिगंबर महाले, मा.डॉ.
राहुल पाटील यांना मिळणार आहे.
खान्देश कस्तुरी गौरव-सौ. छाया प्रकाश मुंदडा (शैक्षणिक क्षेत्र), मा. कु. भूमिका संदिप घोरपडे (कलाक्षेत्र), मा. सरपंच सौ.सुषमा वासुदेव देसले (सामाजिक क्षेत्र), मा. सौ. ज्योती दिनेश धनगव्हाळ (उद्योजक क्षेत्र), मा. सौ. वंदना गोकुळ बागुल
(अहिराणी ग्रंथ सेवा प्रकाशन), मा. सौ. जयश्री दाभाडे (सामाजिक कार्य,पत्रकारिता), मा. सौ. नीलिमा सोनकुसरे (सामाजिक कार्य) तसेच खान्देश भुषण-मा. श्री. नानाभाऊ पाटील (ज्येष्ठ साहित्यिक अहिराणी रामायण ग्रंथ), मा.श्री.तानाजी शिंदे (अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन), मा. श्री. सुदाम महाजन (अहिराणी गझलकार), मा. श्री. किशोर कुलकर्णी (सुंदर हस्ताक्षर), श्री. गोकुळ पाटील (कलाक्षेत्र),श्री. सचिन कुमावत (कलाक्षेत्र), श्री. ईश्वर भाऊ माळी (कलाक्षेत्र), श्री. प्रविण माळी क्षेत्र (कलाक्षेत्र),श्री. सागर देशमुख (कलाक्षेत्र), श्री. दीलीप बाशिंगे (कलाक्षेत्र), श्री. प्रशांत मनोहर निकम (उद्योजगता), श्री. अनिल मोरे
(कलाक्षेत्र), श्री. डॉ.शरद तुकाराम पाटील (गोपनीय अंमलदार) आदींची नावं जाहीर करण्यात आलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button