Amalner: किरकोळ वादातून गावात गोळीबार..!चाकू हल्ला..!दोन जण जखमी..!पोलिसांत गुन्हा दाखल…!
अमळनेर किरकोळ कारणावरून झालेल्या वादात गोळीबारासह चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना शहरातील शिरुड नाका परिसरात घडली आहे. यात दोन व्यक्ती
गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतीत सविस्तर माहिती अशी की काल रात्री 10 वाजून 30 मि नी कन्हेया मित्र मंडळ शिरुड नाका अमळनेर येथे किरकोळ इथे का थुंकला असा प्रश्न विचारल्याचा राग येऊन हुज्जत घातली.आणि मनोज बिऱ्हाडे ने चाकु काढला आणि चेतन ला चाकूने वार केला.तर गौतम बिऱ्हाडे याने देखील वार केले यावेळी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एकाने हवेत दोन टाऊंड फायर केले.
या प्रकरणी फिर्यादी दीपक गनेशराव पाटील रा शिरुड नाका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात भा दं वि 307,141143,147,148,149 34 आर्मी ऍक्ट 3,25 27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनोज उर्फ आर्यमान मंगल बिऱ्हाडे ,गौतम मंगल बिऱ्हाडे,अरविंद बिऱ्हाडे, राकेश विशाल सोनवणे
शुभम शेटे इतर 4 ,5 इ वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी फरार असून तपास पीएसआय गंभीर शिंदे करत आहे.






