Bollywood

पनामा पेपर्स प्रकरण..!बिग बी आणि ऐश्वर्या ला ईडीची नोटीस..! होणार चौकशी…!

पनामा पेपर्स प्रकरण..! बिग बी आणि ऐश्वर्या ला ईडीची नोटीस..! होणार चौकशी…!

जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय दिल्लीतील लोकनायक भवन येथे ईडीसमोर हजर होणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आधीच प्रश्नांची यादी तयार केली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे ५०० लोकांचा समावेश होता. यातून नेत्यांसह, अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील नावाजलेल्या व्यक्तींची नावं समोर आली. या सर्वांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. याबाबत कर अधिकारी तपासात गुंतले आहेत.

महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनचीही चौकशी करण्यात आली होती.आणि आता विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय बच्चन आणि महानायक अमिताभ बच्चन यांची देखील चौकशी केली जाणार आहे.

काय आहे पनामा पेपर्स प्रकरण..?

पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे.
2016 मध्ये, यूकेमध्ये पनामा-आधारित लॉ फर्मचे 11.5 कोटी कर कागदपत्र लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारताबद्दल बोलायचे झाले तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली आहेत. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे.
एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. ऐश्वर्याला यापूर्वी एका कंपनीची संचालक बनवण्यात आले होते. त्यानंतर तिला शेअर होल्डर म्हणून घोषित करण्यात आलं. कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होतं.
ऐश्वर्याशिवाय वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील कंपनीत भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये ही कंपनी बंद पडली.
पनामा पेपर लीक प्रकरणात एका कंपनीचे काही पेपर लीक झाले होते. हा डेटा एका जर्मन न्यूजपेपरने पनामा पेपरच्या नावाने ३ एप्रिल २०१६मध्ये रिलिज केला होता. यामध्ये भारतासहित २०० देशांमधील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांचा समावेश होता. त्यांच्यावर मनी लॉंड्रिंगचा आरोप करण्यात आला होता.
या यादीमधअये ३०० भारतीयांची नावे आहेत. त्यात बच्चन कुटुंबीतील अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा देखील समावेश असल्याचे म्हटले जाते.
ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) आणि इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स (ICIJ) या दोन प्रकल्पातील पत्रकारांनी घेतलेल्या शोधमोहीमेतून ही माहिती समोर आली आहे. जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस असल्याचे सांगितले जात होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button