मोहमद कैफ कतरिनाचे वडील..? फोटो झाले व्हायरल..!
मुंबई बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असून सध्या ती तिच्या विवाहामुळे चर्चेत आहे.
गेल्या 2 महिन्यांपासून म्हणजे विवाह निश्चित झाल्या पासून सोशल मीडियावर फक्त कॅटचीच चर्चा आहे. नुकतीच कतरिना कैफ बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकली.कतरिना कैफ सध्या तिच्या वडिलांमुळे चर्चेचा विषय ठरते आहे. कारण काही दिवसांपासून कतरिनाचे माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफसोबतचे काही फोटो समोर येत आहेत. त्यामुळे ते कतरिनाचे वडील असल्याचे सांगितले जात आहे, कारण कतरिना कैफच्या वडिलांचे नाव देखील मोहम्मद कैफ आहे. हा फोटो समोर आल्यापासूनच कतरिना आणि मोहम्मद कैफ यांच्या नात्याबद्दलची चर्चा सुरु झाली. पण आता या फोटोमागची सत्यता समोर आली आहे.कतरिना कैफचे क्रिकेटर मोहम्मद कैफसोबतचे फोटो व्हायरलमोहम्मद कैफ यांच्या सोबतच्या तिच्या फोटोबद्दल सांगायचे झाले तर, कतरिनाच्या आडनावामुळे दोघांचं नातं जोडलं गेलं आहे. कारण कतरिनाच्या वडिलांचे नाव मोहम्मद कैफ आहे.
यामुळे सर्वजण कतरिना कैफच्या वडिलांबद्दल बोलत आहेत. या फोटोमध्ये कतरिना कैफ क्रिकेटर मोहम्मद कैफसोबत आहे, त्यामुळे सर्व प्रसिद्ध माजी क्रिकेटर मोहम्मद कैफला कतरिना कैफचे वडील मानत आहेत. पण दोघांमध्ये असे कोणतेही नाते नाही.कतरिनाच्या लग्नात तिचं संपुर्ण कुटुंब हजर होतं. पण तिचे वडिल मात्र दिसले नाही. त्यामुळे अनेकांनी वडिलांचे नाव इंटरनेटवर सर्च केले. त्यात हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता.
त्यामुळे सध्या सर्वत्र कतरिनाचीच चर्चा आहे. कतरिना कैफने क्रिकेटर मोहम्मद कैफची भेट घेतली होती जेव्हा ती सूर्यवंशी सिनेमाच्या प्रमोशनसाठी लाईव्ह शोमध्ये गेली होती. त्याचवेळी दोघांची भेट झाली होती, पण या दोघांमध्ये बाप-मुलीचे नाते नाही आणि कोणताही अर्थ नसताना लोक क्रिकेटर मोहम्मद कैफला कतरिनाचे वडील म्हणून संबोधत आहेत, पण खऱ्या आयुष्यात कतरिनाचे वडील खूप वर्षांपासून त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहत नाहीत.






