सावद्यात रेहाना बी हॉस्पिटलच्या कोविड लसीकरण शिबिराला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली भेट
“आधीपासूनच लोकांचे मनातील सर्वोत्तम कोरूना योद्धे व सदरील हॉस्पिटलचे डॉ.वसीम खान यांच्या कार्याची जिल्हाधिकारी यांनी प्रशंसा केली”
सावदा प्रतीनीधी युसूफशाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे जिल्हाधिकारी यांच्या दूरध्वनी भ्रमणध्वनी आदेशावरून नगरपालिके मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी शहरात “माझे कुटुंब लसयुक्त कुटुंब”ही मोहीम दि.१०/१२/२०२१ ते ११/१२/२०२१ पर्यंत राबवण्यासाठी पालिकेतील त्यांच्या अधीन येणाऱ्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करून संपूर्ण शहरातील विविध भागात लसीकरण शिबिराचे नियोजनबद्धपणे आयोजन केले होते.
यानिमित्ताने पाहणी करण्यासाठी सावदा शहरात आलेले जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी बडा अखाडा येथे रेहाना बी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये सुरू असलेले कोरोना लसीकरण शिबिराला भेट दिली. येथे सुरू असलेले लसीकरणाचे कामकाच त्यांनी बघितले असता आधीच लोकांचे मनातील कोरोना युद्धे व सदर हॉस्पिटल चे डॉ. वसीम खान यांचे कार्याची जिल्हाधिकारी यांनी प्रशंसा केली. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण,न.पा.वसुली विभागाचे अधिकारी अहुजा साहेब,अरुण ठोसरे, सावदा तलाठी शरद पाटील, ग्रामीण रुग्णालय सावदा येथील डॉक्टर्स व कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.






