अमळनेर: माजी सैनिकाचा मुलाच्या लग्नात अनोखा उपक्रम… आहेर ऐवजी ध्वजनिधी केला संकलित..!
अमळनेर येथील माजी सैनिक किर्तिकुमार चौक यांनी आपल्या मुलाच्या लग्नात भारतीय सैन्यातील वीर सैनिक व कुटुंबियांच्या कल्याणार्थ ध्वज निधी दिना निमित्त निधी संकलनासाठी स्वतंत्र पेटी ठेवून लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडींना आहेरा ऐवजी भारतीय सैन्य साठी ध्वजनिधी ची मदत जमा करणारे बॅनर लावून निधी संकलित केला. भारतीय सैन्याबद्दल असलेले प्रेम व राष्ट्रभक्तीचा परिचय एक सेवानिवृत्त सैनिक म्हणून त्यांनी पुन्हा करून दिलेला आहे.
ब्रम्हे गल्ली अमळनेर चे रहिवासी असलेले सेवानिवृत्त सैनिक कीर्ती कुमार चौक यांचे संगीत विशारद चि.योगेश आणि चोपडा येथिल चिं सौ का ऋतुजा वसंत जोशी हिचा विवाह धुळे येथे संपन्न झाला.याप्रसंगी वर व वधू पित्यांनी लग्नात कुठल्याही प्रकारचा आहेर न स्वीकारता त्याऐवजी ७ डिसेंबर हा दिवस ध्वज निधी दिवस होता यानिमित्ताने विर शहीद सैनिक,विर माता पिता, विर पत्नी, त्यांचे कुटुंबियांच्या कल्याणार्थ ध्वज निधीला मदत करण्याचे आवाहन करून आप्तेष्ट व नातेवाईकांनी मोठ्याप्रमाणात सदर ध्वज निधी संकलनात योगदान दिले.सदरचा जमलेला निधी हा जिल्हाधिकारी साहेबांकडे दोघेही सुपूर्द करणार आहेत.माजी सैनिकांच्या या उपक्रमाचे नातेवाईक व वऱ्हाडीनी कौतुक करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने सेवानिवृत्तीनंतरही देशप्रेम दाखवून दिल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली होती.






