Amalner

अमळनेर: चोऱ्यांचे सत्र थांबेना..!आता मोबाईल टॉवर ची बॅटरी आणि डिझेल चोरी..!

अमळनेर: चोऱ्यांचे सत्र थांबेना..! आता मोबाईल टॉवर ची बॅटरी आणि डिझेल चोरी..!

अमळनेर जैतपीर येथील रिलायन्स मोबाईल टॉवरची जनरेटरची बॅटरी व डिझेल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जैतपीर येथील रिलायन्स कंपनीच्या टॉवर येथे जनरेटर बॅटरी 7 हजार रु आणि 95 लिटर डिझेल किंमत 8835 रु अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.दि ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता टेक्निशियन नानाभाऊ पाटीलने जनरेटर मध्ये १५५ लिटर डिझेल टाकले. दि ९ डिसेंबर रोजी टॉवर बंद पडल्याचा फोन आल्याने त्याठिकाणी भेट दिली असता त्याठिकाणी जनरेटरची बॅटरी दिसली नाही व डिझेल ही कमी झाल्याचे दिसून आले. सुपरवायझर दादाभाई खलाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास पो. कॉ किशोर पाटील करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button