कादवा कारखाना येथे ११४३ लाभार्थ्यांचे लसीकरण मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
कादवा सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोड कामगार, कादवा कामगार व त्यांचे कुटुंब यांच्या साठी कोरोना लसीकरण शिबिर संपन्न झाले.२८ जून-१२०, १४ आॅगष्ट-१६०, ८सप्टेंबर-२००, २३सप्टेंबर-२००, ११आॅक्टोबर-१८०, २०आॅक्टोबर-९१, ९नोव्हेंबर-५८, १९नोव्हेंबर-१३४ या प्रमाणे आठ लसीकरण सत्र संपन्न होऊन एकुण ११४३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने कादवा क्षेत्रात दाखल झालेल्या ऊसतोड कामगारांच्या प्रत्येक झोपडीला क्रमांक देऊन प्रत्येक कुटूंबाचा सर्वे करण्यात आला.त्या कुटूंबातील लहान बालके,गर्भवती स्त्री, कोणाचे लसीकरण आहे या प्रमाणे वर्गीकरण केल्याने लाभार्थ्यांचे सर्वेक्षण योग्य प्रकारे झाले.
१९ नोव्हेंबर २१ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री ९:३० वा.पर्यंत रात्री चे कोरोना लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते.त्यामधे ऊसतोड कामगार व कुटूंबाचा प्रचंड प्रतिसाद लाभला.बरेच कुटुंब स्वयंस्फूर्तिने लसीकरण ठिकाणी येऊन रजिस्ट्रेशन करून लस घेत होते.जे ऊसतोड कामगार लसीकरण ठिकाणी आले नाही त्यांच्या झोपडीमधे जाऊन त्यांचे लसीकरण करण्यात आले.लसीकरणाचे महत्व सांगून मन प्रबोधन केल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढला.१३४ लाभार्थ्यांचे लसीकरण सत्र संपन्न झाले.
सुरूवातीला लसीकरण प्रबोधन करून कार्यकारी संचालक श्री.हेमंत माने, सचिव श्री.राहुल ऊगले,आर्थिक सल्लागार श्री.बाळासाहेब ऊगले,मुख्य शेतकी अधिकारी श्री.मच्छिंद्र शिरसाठ, वैदयकिय अधिकारी डाॅ.प्रदिप तिडके, कादवा कामगार युनियन चे अध्यक्ष श्री.दत्तात्रय वाघचौरे, सरचिटणीस श्री.संतोष मातेरे यांच्या शुभ हस्ते कोरोना प्रतिबंधक वस्तु मास्क, सोप, सॅनिटायझर आदी चे ऊसतोड मजुर व कुटूंबाला वाटप करण्यात आले.
यासाठी तालुका वैदयकिय अधिकारी डाॅ. सुभाषजी मांडगे, वरखेडा चे वैदयकिय अधिकारी डाॅ.डौले , मातेरेवाडीचे समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.शुभम शिंदे, आरोग्य सहाय्यक श्री.जोशी व श्री.जमधडे, आरोग्य सेविका सौ.कविता सोनवणे, आरोग्य सेवकश्री.गांगुर्डे, आशा सौ.पुनम राजगुरु , आशा विठा गांगोडे व इतर आदींचे सहकार्य लाभले.
२५ नोव्हेंबर२०२१ रोजी प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत कामगार कल्याण मंडळ सातपूर,नासिक व कादवा सहकारी साखर कारखाना, उपकेंद्र मातेरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर संपन्न झाले.या शिबिराचे उदघाटन बोपेगावचे सरपंच श्री.वसंतराव कावळे,श्री.हेमंत माने,श्री.बाळासाहेब ऊगले,श्री.राहुल ऊगले, श्री.दत्तात्रय वाघचौरे, श्री.संतोष मातेरे,श्री.शरदचंद्र चव्हाणके, डॉ.प्रदिप तिडके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
त्यामध्ये डाॅ.नितीन वाघ( अस्थिरोग), डाॅ.प्रितम अहिरराव(ह्रदयरोग), डॉ.मनोज दगडे(नेत्ररोग), डाॅ.नागेश डोलारे(दंतरोग) यांनी रुग्ण तपासणी केली.शिबीरात योग्य उपचार करून ज्यांना अधिक उपचाराची आवश्यकता आहे त्यांना उपचाराचे मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरासाठी चेअरमन श्री.श्रीराम शेटे, व्हा.चेअरमन श्री.उत्तम बाबा भालेराव व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले.






