दिलाचे Talk…डस्टबीन..! जरूर वाचा…
ले. मिना सैंदाणे
तुळशीचे लग्न लागले की विवाह चालू होतात. ज्यांच्या घरी उपवर मुले मुली असतात.यंदा कर्तव्य आहे म्हणजे आपली जबाबदारीची वेळ आहे एकदाचे हात पिवळे करायचे असे ते ठरवतात.मनात कोणाला बोलवायचे काय करायचे हे चालू असते मधेच मनात गाणे गुण गुणले जातात.
चला, चला, चला,
लग्नाला चला,
सांडकाया, भांडकाया,
लग्नाला चला.
शेतकरी नवरा महान
शेतकरीण, बाई शोभे
नवरी छान.
नाचू या गाऊ या
हरपून भान.
सई बाई घेई तानेवर तान
नवरा बोहल्यावर खोळबला
मामींनो आणा नवरीला
चला, चला, चला,
लग्नाला चला.
हे गाणे जुने असेल तरी यातील नवरा हा शेतकरी आहे तो किती महान असतो हे त्यातून दर्शवले आहे.
पण आताच्या मुलींना जगाचा पोशिंदा नवरा नको आहे फक्त नोकरी वाला च नवरा हवा आहे.
आई, बापाला जावई शहरातील नोकरी वाला हवा आहे. काय तर मुलगी सुखी राहील. हवा तेवढा पैसा लाऊ पोरीला.
लोक पैशाने विकत ग्यायला निघाले आहेत मुलाला मग काय पैसा दिला आहे कोणलाच काही बोलायची सोय नाही असे त्यांना वाटते.
पण या पैशा पाई ते सर्व मुलीचे सुख पाहत असतात. त्यात मुलगी नोकरी वाली असते म्हणजे आमची हि कमावती आहे.
इथे काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. एका लग्नात बायकांच्या गप्पा जरा वेगळ्या च होत्या. मुलगी बघितली का. जमले का मुलाचे. मनासारखे मिळाले का?
अहो, मुलीवाले खूप भाव खातात सद्या एक महीला बोलली.
काय तर मुलगी नोकरीला आहे हुंडा, देणार नाही. काय तर पगार तिचा तुमच्या घरी येईल.
वरून मुलाला मुली पेक्षा जास्त पगार. वरून मुलीला मुलगा आवडला पाहिजे.
घर बघायला दहा जण पण संसार करायला फक्त दोनच जण त्यांना हवे. आई, वडील, नको कुटूब नको. एका अर्थी फक्त मुलगा हवा.
दुसरीने न राहून सांगितले.
व, माय बायोडाता पाहता घरी बलावता. पोराले अन् मांगुन नाहीं मनता काय त चायीस लाख पॅकेज वाल्या पोऱ्याले पोरं देली नाहीं. अन् या दहा लाख पॅकेज वाल्या ले पोरं देतीन का?
तिसरी ने जरा हटके सांगितले.
अहो, घर पाहता ते अणि कीती जण आहेत घरात विचारतात अणि नवीन शब्द वापरतात.
“काय तर म्हणे तुमच्या घरात ड्सबिन पण आहेत का’?
सर्व महीला बघत राहिल्या मी ही जरा विचारात पडले ड्सबीन तर सर्वांच्या च घरात असते. त्यात काय विशेष.
तेच विशेष आहे त्या बोलतं होत्या ड्सबिन म्हणजे. घरातील वडीलधारी माणसे जसे की आई, वडील, आजोबा, आजी.
मी जरा अचंबित झाले. किती मोठी शोकांतिका होति हि ज्या घराच्या पायाला त्यानी हा शब्द वापरला ते जर यांना नको आहेत तर त्यांचा मुलगा का हवा त्यांचे खुख का हवे सर्व्ह वेलसेट का हवे.
मुलीला तिचे आई, वडील हवेत पण मुलाचे नको. मग तेच नको तर एखाद्या अनाथ आश्रमातिल मुलगा बघा अणि त्यांचे भले करा. कोणीच राहणार नाहीं फक्त दोनच जणाचा संसार त्यांचे भले होईल. आता पर्यंत नाण्याची एकच बाजू बघितली जात होती पण हि हि एक बाजू आहे.
पालक आपल्या मुली साठी चांगलेच स्थळ शोधत असताना तीच्या वयाचा ते वीचार करत नाही काय तर कमावते. कोणीही करेल या भ्रमात ते राहतात अणि मुलीचे वय निघून जातं असते. त्यांना हे कळत नाही की आई, मुलगी यांचा हट्टा पायी चांगले, चांगले स्थळ हातचे निघून गेले असतात. त्यांना वाटते मुला वाल्याला गरज असेल तर पैसा पाहून येईल परत. पण काही मुलांना समजून घेणारी अणि आहे त्यात समाधानी असणारी मुलगी हवी असते पैसा, किंवा हुंडा नको असतो कारण तो विकाऊ नसतो त्यांचे वय जरी झाले तरी त्याला कमी वयाची मुलगी मिळू शकते. पण जास्त वय झाले ल्या मुलीला कमी वयाचा मुलगा मिळेल का हा विचार पालकांनी करावा असे मला वाटते. जे
समाजात अनेक घटना घडत आहेत. तंत्र नानाने प्रगती झाली खरी आहे पण नोकरी कुठेच आजच्या घडीला नाही आहे बऱ्याच मुली सरकारी नोकरी वाला च हवा आहे हा त्यांचा आटा हास आहे मुली कंपनीत नोकरी करतात लग्न मात्र सरकारी मुलाशी करायचे सांगतात.
काही ठिकाणी एकच मुलगी मग एकदाच लग्न होईल म्हणून तिची सर्व हाऊस पुरविली जाते. जे मागेल ते दिले जाते काय तर मुलगी सासर हुन नोकरी ठिकाणी जाणार मग तीला नवीन संसार रुखवतात दया. बरं दिले तर काय काय द्याचे
परवाच एका लग्नात गेले रुखवता त पुर्ण संसार होता लसूण पासून तर साबणाच्या वडी पर्यन्त काहीच कमी नाही. या एका समजाचे पाहून दुसऱ्या सामजाचे हि हेवा करतात. अमक्या, तमक्या ला एवढे मिळाले मग मीच का मागू नये पण अशाने समाजात अनेक प्रथा परंपरा पडत आहे. त्यात सर्व सामान्य माणूस होरपळतोय ज्याच्या जवळ आहे तो देईल. ज्याच्या जवळ नसेल त्याने काय करावे. त्यात लोक चांगली मिळाली समजूतदार तर बरे नाहीं तर मुलीचा छळ आहेच. हे कुठे तरी थाबायला हवे असे मला वाटते. यात मी कुणाचे मन दुखवत नाही आहे. ड्स्टबीन हा विषय ऐकल्या पासून लिहावेसे वाटत होतें मनातील घालमेल सुरू होती ती फक्त या साहित्य रूपी आरशात मी मांडले. एवढेच.






