sawada

सावदा पालिके तर्फे “माझे कुटुंब लसयुक्त कुटुंब” लसीकरण मोहीम सुरु.

सावदा पालिके तर्फे “माझे कुटुंब लसयुक्त कुटुंब” लसीकरण मोहीम सुरु.

“पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा – मुख्याधिकारी किशोर चव्हाण”

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

महाराष्ट्र शासनातर्फे कोविड १९ च्या संभाव्य तिस-या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे
कोविड १९ लसीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष लसीकरण मोहिम अंतर्गत “माझे कुटुंब लसयुक्त कुटुंब” लसीकरण
मोहिम राबविण्यास सुरुवात झाली आहे. या विशेष लसीकरण मोहिम अंतर्गत ज्या लाभांर्थ्यांचे पहिल्या डोसचे लसीकरण
अद्यापही झालेले नाही अशा पात्र लाभांर्थ्यांनी पहिला डोस व दूसरा डोस देय असलेल्या लाभांर्थ्यांनी दुस-या डोसचे लसीकरण करुन घ्यावे.

याबाबतची काळजी घेवून जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिका व सावदा ग्रामिण रूग्णालय यांच्या संयुक्तिक विद्यमाने कोविड १९ लसीचे प्रथम व द्वितीय डोस न
घेतलेल्या नागरिकांसाठी “लसिकरन आपल्या दारी”विशेष मोहिमे अंतर्गत उद्या दि.१० डिसेंबर रोजी सकाळी ख्वाजानगर,उर्दू शाळा परिसर, शेखपुरा,रविवार पेठ तर दुपार व संध्याकाळी आंबेडकर नगर, काझीपुरा,मदिना नगर,
जमादार वाडा परिसर शहरातील या भागात”माझे कुटुंब लसयुक्त कुटुंब” लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.तसेच
ग्रामीण रुग्णालय सावदा येथे देखील सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विशेष लसीकरण सत्रचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा.असे आवाहन सावदा पालिकेचे मुख्याधिकारी
किशोर चव्हाण यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button