क्षणचित्रे..!विक्की आणि कॅटरिनाचा राजेशाही विवाहसोहळा संपन्न..!सोशल मीडियावर मिम्स चा पाऊस..!
राजस्थान बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा राजेशाही विवाहसोहळा संपन्न झाला. वधू-वरांनी पारंपरिक पद्धतीने वडिलधा-या मंडळींचे आशिर्वाद घेत विवाह बंधनात अडकले. या नवदांपत्यावर फुलांचा वर्षाव करून सर्वांनी अभिनंदन केले.हा राजेशाही विवाहसोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेंसेस फोर्ट बरवाडा या आलिशान हॉटेलमध्ये पार पडला. सध्या विवाह सोहळ्याचे सर्व पारंपरिक रुढीवत विधी सुरू असून रात्री उशीरा उपस्थितांना विवाहाची खास मेजवानी असणार आहे.पंजाबी स्वॅग दाखवत विकीने एंट्री करून उपस्थित आणि कॅट चे मन जिंकले. या आलिशान राजेशाही विवाह सोहळ्याला या दोघांचे जवळचे नातेवाईक आणि निवडक मित्रमंडळी उपस्थित होते. यावेळी विकीने व-हाडी मंडळींसोबत खास पंजाबी स्वॅग दाखवत एंट्री केली. यावेळी दमदार ढोल-ताशे वाजत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. लग्नावेळी विकीने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती.ह्या शाही विवाह सोहळ्यत उपस्थित असलेल्या व-हाडी मंडळींनी एकसारख्या पगड्या डोक्यावर घातल्या होत्या. यामध्ये सनी कौशल, कबीर खान,अंगद बेदी, करण जोहर अशा मान्यवर मंडळींचा समावेश आहे. या विवाह सोहळ्यात अभिनेत्री सारा अली खान आणि आलिया भट उपस्थित आहेत.या दोघीजणी गुरुवारी सकाळी मुंबईहून राजस्थानला रवाना झाल्या. यावेळी दोघींनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती.या राजेशाही विवाहसोहळ्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर जाऊ नयेत यासाठी येणा-या व-हाडींना मोबाईल वापरण्यास मनाई केली होती. इतकेच नाही तर लग्नाच्या दिवशी हॉटेलच्या संपूर्ण खिडक्या, दरवाजांना काळे पडदे लावण्यात आले होते.दरम्यान ह्या विवाहवर जबरदस्त मिम्स चा पाऊस गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. यात सर्वात जास्त सलमान खान आणि रणबीर कपूर यांना नेटकऱ्यांनी निशाण्यावर घेतलं आहे.एका पेक्षा एक हसून हसून पोट दुखायला लावणारे कमेंट्स आणि फोटो नेटकऱ्यांनी शेअर केले आहेत.







