हवामानतज्ञ पंजाबराव डख ,गणेश फरताळे यांची चांदवडला गणेश निंबाळकरांच्या वाढदिवसाला उपस्थिती
उदय वायकोळे चांदवड
चांदवड तालुक्यातील दहिवद या गावातील युवा व्यक्तिमत्त्व गणेशभाऊ निंबाळकर म्हणजे प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष व नामदार बच्चू कडू यांचे मर्जीतील कार्यकर्ते होय. लहानपणापासूनच अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ती असलेल्या गणेश निंबाळकर यांनी अनेक शासकीय कार्यालये गाजविली आहेत,जेथे शेतकरी कष्टकरी यांच्यावर अन्याय होत असेल तेथे तातडीने हजर होऊन अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारायला श्री गणेशभाऊ निंबाळकर पुढे मागे पाहत नाहीत.आज त्यांचा वाढदिवस व शेतकरी मेळावा असे आयोजन चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सेल हॉल मध्ये करण्यात आले होते.
यासाठी हवामानतज्ञ श्री पंजाबराव डख,युट्युब वर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे गणेश फरताळे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.पंजाबराव डख यांनी शिवकालीन काही घटना,पद्धती यांचा दाखला देऊन त्यानुसार योग्य हवामान अंदाज कसे असतात याची माहिती दिली.यावेळी प्रकाश चव्हाण, राम बोरसे,गोरख ढगे यांसह प्रहार सैनिक व नागरिक उपस्थित होते.






