Nashik

व्ही. एन. नाईक महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन

व्ही. एन. नाईक महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

दिंडोरी:वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी येथे विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ संजय सानप होते. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या राज्यघटना निर्मितीतील योगदानाबाबत विवेचन केले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय, सामाजिक , आर्थिक व सांस्कृतिक योगदानाबद्दल माहिती दिली . या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. महादेव कांबळे यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या या संदेशाचे महत्व विशद केले . प्रा. नाना चव्हाण, डॉ. प्रल्हाद दुधाने, प्रा पंकजा अहिरे , शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी परिश्रम घेतले . महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button