Nashik

उद्या खेडगावला शरद पवारांच्या उपस्थितीत मेळावा

उद्या खेडगावला शरद पवारांच्या उपस्थितीत मेळावा
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी: तालुक्यातील खेडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय खेडगाव नूतन वास्तु इमारत उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा उद्या सोमवार 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत पार पडत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ हे राहणार आहेत यावेळी दिंडोरी तालुक्याचे लोकनेते कादवा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा व नरहरी झिरवाळ यांचे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा पार पडणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार दिलीप बनकर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार डॉ सुधीर तांबे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,अॅड. बाजीराव कावळे, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी खासदार समीर भुजबळ, मविप्र समाज अध्यक्ष तुषार शेवाळे, सरचिटणीस निलिमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोनाना अहिरे, चिटणीस डॉ सुनील ढिकले, भगिरथ शिंदे, पंढरीनाथ थोरे, तानाजीराव बनकर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले , माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, माजी आमदार जीवा पांडू गावित, माजी आमदार शांतारामतात्या आहेर, माजी आमदार जयंतराव जाधव, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विद्याताई पाटील, राष्ट्रवादी निफाड तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे, दिंडोरी तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील आव्हाड, राष्ट्रवादी सुरगाणा तालुका अध्यक्ष चिंतामण गावित, पेठ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दामू राऊत आदी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे दिंडोरी तालुका संचालक दत्तात्रय पाटील, जेष्ठ नेते गणपत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button