Nashik

खा.हरिश्चंद्र चव्हाण २५ डिसेंबर ला राष्ट्रवादीत प्रवेश करणार अफवा

खा.हरिश्चंद्र चव्हाण २५ डिसेंबर ला राष्ट्रवादीत प्रवेश करणार अफवा

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण भाजपला सोडचिठ्ठी देऊन येत्या 25 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती गेल्या निवडणुकीत दिंडोरी लोकसभेच्या उमेदवारीसाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे नाव प्रामुख्याने अग्रेसर होते परंतु अचानक हरिश्‍चंद्र चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी नाकारली ,आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी ही पक्षाकडे व पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली .त्यामुळे पक्षातून काढून टाकण्याच्या धमक्या ही यावेळी देण्यात आल्या होत्या .परंतु हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी पक्ष सोडला नाही पक्ष व कार्यकर्ते सांभाळून ठेवले सर्वच पक्षातील त्यांचे संबध असल्याने त्यांनी माणूसपण टिकवुन ठेवले. यामुळे हजारो कार्यकर्ते आजही त्यांच्या पाठीशी आहेत.पक्षाशी एवढे एकनिष्ठ राहुनही उमेदवारी नाकारली त्यामुळे नाराज झालेल्या भाजप पक्षातील हरिश्चंद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा असा आग्रह धरत आहेत. मात्र मधल्या काळात खा.चव्हाण यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण यांनी तब्बल एक वर्ष आपल्या तब्येतीकडे लक्ष दिले. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आता ते आपले काम करत आहेत पक्षात होणारी घुसमट सहन होत नाही. अशा प्रतिक्रिया कार्यकर्ते बोलतआहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची व खा.हरिश्चंद्र चव्हाण यांची मैत्री जिल्हयाला नव्हे तर महाराष्ट्राला माहिती आहे. येत्या 25 डिसेंबर रोजी योगायोगाने खा.चव्हाण यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हरिचंद्र चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा जोरात सुरू आहे .खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी सिंचन, रस्ते ,वीज ,शिक्षण तसेच शेतकऱ्यांचे ही अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे तिसरी टर्म पूर्ण करताना खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माणसातली माणुसकी जपल्या मुळेच त्यांची लोकप्रियता आजही कायमपणे टिकून आहे. पक्षातीलच काही मंडळींनी खा.चव्हाण वरचढ होऊ नये म्हणून उमेदवारी नाकारली. लोकसभेत खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी 86% उपस्थित राहून टॉप टेन खासदारामध्ये
त्यांचा समावेश आहे .पी .आर. एस लेजिस्लेटिव्ह रिसर्च या संस्थेने दिलेल्या आकडेवारीवरून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची तिसरी टर्म ही अतिशय चांगली असल्यामुळेच ते पुढे डोईजड होऊ नये यामुळे त्यांचे पक्षातून तिकीट कापल्याची चर्चा आजही आहे . तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची मनधरणी केली व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ही उमेदवारी साठी आग्रह धरला होता.परंतु खा. चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात उमेदवारी साठी नकार दिला सर्वात मोठ्या अपघातातून ही त्यांनी पक्षाशी एकनिष्ठपणे राहिले .पण त्यांना आपल्याच माणसांनी धोका दिल्यामुळे नाराज झालेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण आता 25 डिसेंबर च्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ही पूर्णतः अफवा पसरवण्यात आली असून आपण नेहमीप्रमाणे आपला संपर्क सुरू केला आहे खंबीर पने भारतीय जनता पक्षाचे काम करत असून जनतेबरोबर सुख दुखा त सहभागी असून आपले कार्यकर्ते यांच्याबरोबर काम सुरूच असून खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्यामुळे . कळवण सुरगाणा मतदारसंघात यापढे कोणाचे पारडे जड होणार हा भाग वेगळा असून याबाबत वे ग वेगळे मतप्रवाह चर्चा सुरू राहतील मात्र आपण आहे त्याच ठिकाणी आपले असून ही अफवा त्यांनी सुनिल घुमरे यांना मत व्यक्त केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button