दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन विविध स्पर्धानी साजरा
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
माझे संविधान माझा अभिमान या उपक्रमांतर्गत दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन विविध स्पर्धा घेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर सी वडजे होते.व्यासपीठावर उपप्राचार्य यु डी भरसठ, पर्यवेक्षक यु डी बस्ते , डॉ जी व्ही आंबोरे, श्रीम एन पी बागुल व कॉलेज विभाग प्रमुख उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्गीत घेण्यात आले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान प्रतिमा पूजन प्राचार्य आर सी वडजे व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर भारतीय संविधान प्रस्तविकेचे सकाळी १०.०० वाजता सामुदायिक वाचन संगीत शिक्षिका श्रीम ए एन देशपांडे यांनी केले.
विद्यार्थ्यांपैकी कु तनुश्री शिंदे, इयत्ता ६वी , राजश्री घरत ८वी यांनी संविधान बाबत मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीम एन पी बागुल यांनी भारतीय संविधान याबाबत सरविस्तर माहिती देऊन संविधनाचा उद्देश समजून सांगितला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर सी वडजे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करतांना सांगितले संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.त्या अंतर्गत आपल्या विद्यालयात
रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. व न्याय, स्वतंत्र, समानता, ,बंधुता या मूल्यांवर आधारित संविधान असल्याने भारतीय संविधनाचा सर्वानी आदर करून लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करूया.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीम यु एस मोगल यांनी केले
यावेळी इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन भारतीय संविधान बाबत आपले विचार,रेखाटन, लेखन, वक्तृत्व त्या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त केले.या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व त्याना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे प्राचार्य आर सी वडजे यांनी कौतूक करून त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीम एस एम विरकर, श्रीम व्ही ई सोनवणे, सर्व सदस्य, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम डी के चव्हाण यांनी तर आभार संतोष कथार यांनी मानले.
फोटो- दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य आर सी वडजे, उपप्राचार्य यु डी भरसठ,पर्यवेक्षक यु डी बस्ते , डॉ जी व्ही आंबोरे, श्रीम एन पी बागुल आदी






