अमळनेर: दरेंगाव येथून मोटरसायकल चोरीस…
अमळनेर तालुक्यात सध्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दर दोन दिवसाआड मोटरसायकल चोरी,गुरे चोरी तसेच इतर चोऱ्या सतत होत आहेत. आता दरेगाव येथील इसमाची मोटारसायकल अंतुर्ली येथून चोरीस गेली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दरेगाव येथील समाधान शिवाजी पाटील यांची मोटारसायकल अंतुर्ली येथे दि.19 टोजी संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेदरम्यान कार्तिक स्वामी मंदिरासमोर विनायक कलाल यांच्या टपटीजवळ लावलेली होती.सदर मोटरसायकल ही स्प्लेंडर प्लस कंपनीची असून काळ्या रंगाची एम एच 15 सीबी 0170 क्रमांकाची मोटारसायकल होती. गाडी जागेवर आढळून आली नाही म्हणून आजूबाजूला शोध घेतला असता मिळून आली नाही.मारवड पोलिसात कलम 379 प्रमानर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो विशाल चव्हाण करीत आहे.






