अमळनेर: स्वादिष्ट नमकीन गोडवूनला आग..!अमळनेर स्वादिष्ट नमकिन गलवाडे रोड अमळनेर मुख्य गोडावुनला आग लागली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की निलेश अशोक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सदर स्वादिष्ट नमकीन च्या उत्पन्नावर कुंटुबाचा उदरनिर्वाह चालतो तसेच या ठिकाणी जवळपास 40 कामगार काम करतात. येथे जवळच मुख्य रिटेल शॉपचे
दुकान देखील आहे.
दिनांक 19/11/2021 रोजी रात्री 08.00 वाजेचे सुमारास
बंद करुन व आमचे मुख्य गोडावुन बंद करुन घरी आलो त्यावेळेस तेथे वॉचमन अरुण शिंपी असे तेथेच बाजुल लांब बाहेर झोपतात आणि नंतर दि.20.11.2021 रोजी सकाळी 10.00 वा.च्या सुमारास मी माझ्या कुंटुबासोबत बाहेरगावी कामानिमीत्त गेलो असतांना दि.21.11.2021 रोजी सकाळी 05.30 वा.च्या सुमारास मला माझे वडील श्री.अशोक लोटन पाटील यांनी फोन केला की दुकानात आग लागलेली आहे व जावुन व तेथील आमचे कामगार घेवुन सदरची आग विझवलेली आहे. तरी सदरची आग हि कशामुळे लागली आहे हे माहीत नसुन आमचे गोडावुन मधील मालाचे नुकसान झालेला आहे.तरी गोडावुनला आग लागल्याबद्दल
तक्रार दाखल करण्यात आली आहे.






