ओबीसी जनजागृती जागर अभियान रथाचे सावदा भाजपतर्फे स्वागत !
सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल
: भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी समाज जनजागृती जागर अभियान रथाचे सावदा शहरात वतीने गुरूवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दाखल झाले. या जागर रथाचे सावदा येथील भारतीय जनता पक्षाचे पदधिकारी व कार्यकर्ते यांनी नारळ फोडून स्वागत केले.
उस्मानाबाद जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीस जागर अभियान रथयात्रा गुरूवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सावदा शहरात दाखल झाली. हा जागर रथ संपूर्ण राज्यात फिरणार आहे. पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने समाजात जनजागृती व्हावी याकरीता ओबीसी जागर अभीयान राबविण्यात येत आहे. या रथाचे सावदा शहरात नगरसेविका रंजनाताई भारंबे यांचा हस्ते पूजन करणात आले.
या अभियानांतर्गत सावदा शहरातील बस स्टँड, इंदिरा गांधी चौक परिसरात रथयात्रा स्वागत करत सदरील व्हिडिओ फीत दाखवण्यात आली. या प्रसंगी भाजपाच्या नगरसेविका तथा शिक्षण सभापती सौ. रंजनाताई भारंबे, नगरसेविका सौ. लिनाताई चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे रावेर तालुका उपाध्यक्ष प्रतिक भारंबे, सावदा शहर उपाध्यक्ष जितेंद्र भारंबे (जे.के भाऊ), गजानन भार्गव, हेमंत (हरी) इंगळे, भरत भंगाळे, अतुल चौधरी, भाऊ धांडे, आकाश भोरटट्के, अनिल तेली, महेश पाटील व आदींची कार्यकर्ते उपस्थिती होते.