खा शि च्या निवडूणुकीचा बिगुल वाजला..!ह्या तारखेला होईल निवडणूक..!
अमळनेर प्रतिनिधी येथील बहूचर्चीत खान्देश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षीक निवडणूका घेण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने अखेर परवानगी दिली असून कोविड प्रादूर्भावाच्या सर्व नियमांचे या निवडणूकीत पालन करून निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख प्रवीण महाजन काही अटी घालून निवडणूक घेण्यास अनुमती दिली आहे! येत्या 23 जानेवारी ला खा शि ची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान संस्थेच्या विद्यमान संचालकांची मूदत ८ एप्रील २०२१ ला संपली परंतु कोविड मूळे निवडणूक घेण्यात आली नाही.पण संस्थेचे संचालक डॉ बी एस पाटील, कल्याण पाटील ही निवडणूक त्वरित घ्यावी या साठी जाहीर पत्रक काढले. प्रसाद शर्मा व लोटन चौधरी यांनी तर आंदोलनाचा इशारा दिला होता ..तर काहींनी मा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक घेणेस आता अधिकृत परवानगी मिळाली असून खा शी मंडळ निवडणूक 2022 च्या जानेवारी महिन्यात होईल अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.खा शि ची निवडणूक ही अनेक कारणांमुळे चर्चेत असते.यात सर्वात मोठी चर्चा ह्या निवडणुकीत केल्या जाणाऱ्या आर्थिक उलाढाली वर असते.एका छोट्या संस्थेच्या निवडणुकीत होणारी मोठी आर्थिक उलाढाल ही इतकी महत्वपूर्ण आहे की सभासद ह्या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत असतात.






