ग्रा.पं.दाखल्यासाठी लसीचे प्रमाणपत्र बंधनकारक करा, जानोरीच्या विशेष ग्रामसभेत ठराव…
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील
जानोरी येथील ग्रामंचायत ने कोरो ना बचाव करण्यासाठी कोवी ड लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने गावात लसीकरण शंभर टक्के होणे अपेक्षित आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे कोणतेही शासकीय कागदपत्रे देतांना दोन्ही लसीकरण घेतल्याचे प्रमाणपत्र घेण्यात यावे अन्यथा शासकीय कागदपत्रे देवू नये असा ठराव जानोरी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला.
मागील दोन वर्षांपासून करोना सदृश परिस्थितीमुळे ग्रामसभा प्रलंबित होते. नुकतेच विशेष ग्रामसभा घेण्याबाबत शासनाकडून हिरवा कंदील देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर जानोरी गावची ग्रामसभा प्रशासक म्हणून लाभलेले ग्रामविस्तार अधिकारी अण्णा गोपाळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाली. यावेळी आपल्या गावचे शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी पुर्ण गावाचे लसीकरण होण्यासाठी ग्रामपंचायतीचे शासकीय दाखले देताना दोन्ही लसीकरण घेतल्याचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय देवू नये असा ठराव संमत करण्यात आला. त्याचबरोबर हागणदारीमुक्तिसाठी ग्रामपंचायतीकडून विशेष प्रयत्न केले जावे तसेच शौचालयासाठी अनुदान घेऊन त्याचा वापर न करणार्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच दुबार मतदार नोंदणी असणार्यांची चौकशी करून कारवाई करणे, पुढील वर्षासाठी अंदाजपत्रक तयार करणे, तसेच गट नंबर ११२४ मध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती द्यावी, पाणीपुरवठा योजनेबाबत सुधारीत नियम, आदी विविध विषयांवर चर्चा करून ठराव संमत करण्यात आला. तसेच विविध शासकीय योजनांबाबत ग्रामविकास अधिकारी के.के.पवार यांनी माहिती दिली. यावेळी तलाठी किरण भोये यांनी ही मतदार नोंदणीविषयी माहिती दिली. यावेळी माजी जि.प.सदस्य शंकरराव काठे, शंकरराव वाघ, गणेश तिडके,भारत काठे, सुभाष नेहेरे,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ विवेक गुरव, आरोग्य सेवक सुरेश भवर, कृषी अधिकारी मनिषा पाटील, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक, सर्व अंगणवाडी सेविका , वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तसेच दत्तात्रय कोरडे, सोमनाथ वतार, भगिरथ घुमरे, कृष्णा लहांगे, गोरख जाधव, रविंद्र बदादे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आभार तलाठी किरण भोये यांनी मानले.






