भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने “जनजाती गौरव दिवस”घोषित करणे भारताच्या आदिवासींसाठी ऐतिहासिक सन्मानाचा दिवस -ना. डॉ. भारती पवार.
उदय वायकोळे चांदवड
आज भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त करंजाळी येथे जनजाती गौरव दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान बिरसा मुंडाचा जन्मदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला .यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला ना. डॉ भारती पवार व ना नरहरी झिरवळ यांनी पुष्पहार अर्पण करून नमन केले आणि उपस्थित आदिवासी बांधव, भगिनींशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदीजींनी हा दिवस ‘जनजाती गौरव दिन’ साजरा करण्याचे घोषित करून भगवान बिरसा मुंडा आणि आदिवासी बांधवांचा मोठा सन्मान केला असून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास गंगा घेऊन जाण्याचे कार्य मोदी साहेब करत आहेत.
आपले जीवन आदिवासी समाजाच्या प्रती वाहून देणारे बिरसा मुंडा यांची जयंती ‘जनजाती गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या या ऐतिहासीक निर्णयामुळे येणाऱ्या पिढ्यांना त्याग, बलिदान व समर्पणाची साक्ष देत राहील. यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे ना. डॉ. भारती पवार यांनी आभार मानले.
बिरसा मुंडांनी संघर्षमय प्रसंगातून मात करत जीवन जगण्याचे कौशल्य त्यांनी जगासमोर ठेवले आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित प्रकाशझोत टाकण्यात आला .
कार्यक्रमात बोलतांना नामदार डॉ. भारती पवार म्हणाल्या कि, “जनजाती समुदायाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे. शेकडो जनजाती क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपले योगदान दिले आहे. केंद्र शासनाचा हा निर्णय म्हणजे जनजाती समुदायाने स्वातंत्र्यलढ्यात केलेल्या कार्याचा गौरव आहे. जनजाती समुदायाचा इतिहास व संस्कृती नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. तसेच ना. नरहरी झिरवळ यांनी .”बिरसा मुंडा आदिवासी समाजासाठी एक प्रेरणास्थान होते. त्यांचे कार्य कायमस्वरूपी समाजबांधवांसाठी प्रेरणादायी राहील”असे प्रतिपादन या प्रसंगी केले.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित भव्य कार्यक्रमावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार व महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ना. नरहरी झिरवळ याचे स्वागत करतांना भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यात अनेक आदिवासी पथकांनी सहभाग नोंदवत शोभायात्रेत आपली उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमात आदिवासी कलासंस्कृती ची ओळखकरून देत आदिवासींचे पारंपरिक खाद्यपदार्थ बनवत तेथील आदिवासी महिला भगिनींनी त्या पदार्थांची ओळख करून दिली, तसेच पारंपरिक आदिवासी कला संस्कृतीचे प्रदर्शन तेथील कला पथकांनी केले. यात पारंपरिक आदिवादी वाद्यांसह आपल्या आदिवासी वेशभूषेत विविध कला सादर केल्या, आदिवासी समाजातील हुशार विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला त्यात काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर कुपोषित मुलांना सकस आहाराचे किट वाटप करण्यात आले. ह्या प्रसंगी भोपाळ मध्यप्रदेश येथून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बिरसा मुंडा यांच्या जयंती च्या लाईव्ह प्रक्षेपणात सर्व उपस्थितांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग संदीप गोलाईत, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, तहसीलदार संदीप भोसले, पोलीस निरीक्षक वसावे साहेब,भाजपा नेते ऐन डी गावित, सुनील बच्छाव, गिरीशजी पालवे, संजय वाघ, दिलीप पाटील,त्रंबक कामडी, छगन चारोस्कर,भास्कर गावित, विलास अलवड, अशोक टोंगरे, डॉ. प्रशांत भदाणे,पुष्पाताई गवळी, विठोबा खांबाईत, रमेश गालाट , रमेश गवळी, लता राऊत, सदाशिव चौधरी, एकनाथ चौधरी, विजयचौधरी,रामदास वाघेरे, ज्ञानेश्वर भोये, विठोबा भोये, डॉ. देवराम गायकवाड, मनोहर चौधरी. संतोष इंफाळ, चंदर भांगरे, महेश तुंगार, यासह सर्वच शासकीय यंत्रणेचे अधिकारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.






