Amalner

खा.शि.च्या फार्मसी महाविद्यालयाला प्रा.र. का. केले यांचे नाव

खा.शि.च्या फार्मसी महाविद्यालयाला प्रा.र. का. केले यांचे नाव

केले परिवाराने संस्थेस दिले पंचवीस लाखांचे डोनेशन

अमळनेर

शिक्षण प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाले आहे. मात्र पायाशी बसून जे शिकता येत ते खरे शिक्षण. आयुष्यात निधीचा उपयोग असा झाला पाहिजे की दात्यांना अधिक निधी देण्याची आपोआप इच्छा झाली पाहिजे , असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते सी.ए.प्रकाश पाठक (धुळे) यांनी केले. खान्देश शिक्षण मंडळ व समस्त केले परिवाराविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले. प्रा.र.का.केले कॉलेज ऑफ बी. फार्मसीच्या शुभारंभप्रसंगी प्रताप महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संस्थेचे पदाधिकारी व प्रमुख अतिथींना निवृत्त प्राध्यापक कै.र.का. केले यांच्या पत्नी रजनी केले व समस्त परिवाराने प्रतिकात्मक स्वरूपात २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. कै. प्रा.र.का.केले खान्देश शिक्षण मंडळाच्याच प्रताप महाविद्यालयात सेवारत होते , हे विशेष…!
यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार अनिल पाटील यांनी केले परिवाराचे व खान्देश शिक्षण मंडळाचे नाते अधोरेखित केले.कुटुंबाचे कुटुंबपण जपत दातृत्वाच्या भावनेने ही देणगी नक्कीच येणाऱ्या पिढीसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी सत्कारणी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम,विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष जितेंद्र जैन,कार्योपाध्यक्ष कल्याण पाटील,संचालक डॉ. बी.एस.पाटील,हरि भिका वाणी, डॉ.संदेश गुजराथी,योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल,चिटणीस प्रा.डॉ.अरुण कोचर,प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रकाश शिरोडे,फार्मसीचे प्राचार्य रविंद्र माळी व केले परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक नीरज अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे मुख्याध्यापक प्रतिनिधी डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.फार्मसीचे प्राचार्य रवींद्र माळी यांनी आभार मानले फार्मसीचे.प्रा. के.सी. पाटील, प्रा. दीपक बारी व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास सिनिअर सिटीझन क्लब, लायन्स क्लब, रोटरी क्लब, मेडीकल असोशीएशन, खा. शि. मंडळाचे माजी संचालक, प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, प्राध्यापक, नगरसेवक, अर्बन बँकेचे संचालक , व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button