सावद्यातील गुटका माफिया सुरेश कुमार अमरनानी यांना भेटली २ दिवसांची पोलीस कोठडी
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे लखन ट्रेडर्स या नावाने प्रसिद्ध दुकान ठिकाणी जळगांव येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांनी दि.१०/११/२०२१ रोजी छापा टाकला असता राज्यात बंदी असलेला विमल गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ दुकानाच्या तळघरातील ३ लाखाच्यावर किमतीचा मोठ्या प्रमाणात अवैध साठा सापडला यामुळे गुटखा तस्कर सुरेश कुमार दिपचंद अमरनाणी यांना सावदा पोलिस ठाण्यात मुद्देमाला अटक करण्यात आली असता त्याचा विरुद्ध गुरनं.१७१/२०२१ भादवी कलम ३२८,३७२,३७३,१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र आज दि.११/११/२०२१ रोजी अटक संशय आरोपी व अवैध गुटखा तस्कर सुरेश कुमार दिपचंद अमरनाणी यांना सावदा पोलिसांनी रावेर न्यायालयत हाजर केले असता त्यास २ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.






