अटी शर्तींच्या अधीन खा शि ची निवडणूक घेण्यास परवानगी..!पण ह्याच अटी शर्तींचा बहाणा देत निवडणूक टाळण्याचा प्रयत्न..!अमळनेर येथील बहुचर्चित खा शि च्या निवडणूक संदर्भात अध्यक्ष अनिल कदम यांनी जिल्हाधिकारी यांना परवानगी मिळण्यासाठी दि.31/08/2021 रोजी पत्र दिले होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत एप्रिल मध्ये पूर्ण झाल्यामुळे सदर संस्थेच्या निवडणुकीस परवानगी मिळणेबाबत विनंती करण्यात आली होती. सदर पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी कोविडं नियम आणि अटी शर्तींच्या आधारे निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे.सदर खानदेश शिक्षण मंडळाचे निवडणुकीस कोविङ-19 विषाणुच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता कोरोना विषयी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करुन खालील प्रमाणे नमुद अटी व शर्तीच्या अधीन राहुन खानदेश शिक्षण मंडळाची त्रैवार्षिक निवडणुक घेण्यात यावी.
1. सदर खानदेश शिक्षण मंडळाचे त्रैवार्षिक सभेच्या ठिकाणी स्वच्छता राखण्यात यावी,
2. प्रत्येक सहभागी व्यक्तीना सॅनिटाईजरचा वापर करणे बंधनकारक करण्यात यावे.
3. सदर ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
4. सोशल डिस्टन्सींग, मास्क, सॅनिटाईनरचा वापर करणे बंधनकारक करण्यात यावे.
5. शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
6. कोरोना या विषाणुच्या दुस-या लाटेचा प्रभाव पाहता गर्दी होऊन रोगाचा प्रसार होणार नाही याची खबरदारी
घ्यावी.
7. या कार्यालयाचे संदर्भिय आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.ह्याच अटी शर्तींना समोर ठेवून ही निवडणूक रद्द करण्याचे देखील प्रयत्न युद्ध पातळीवर केले जाणार असल्याची चर्चा गावात जोरदारपणे रंगली आहे.खा शि ची निवडणूक ही अर्थ कारणाशी निगडित आहे.ह्या निवडणुकीत मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते.तालुक्यात शेठ मंडळी जोरात असून संपूर्ण खा शि त्यांच्या ताब्यात असल्याचे चित्र आहे त्यामुळे आता कार्यकाळ संपला तरीही निवडणूक होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार असल्याची चर्चा आहे.पण असो तथाकथित सत्तेला आवाहन देत डॉ बी एस पाटील,अनिल कदम,कल्याण पाटील,लोटन चौधरी,प्रसाद शर्मा यांनी वेगवेगळ्या मार्गानी हा प्रश्न लावून धरला आहे. आता तरी पहिल्या टप्प्यात ह्या सदस्यांना यश आले आहे. यापुढे खा शि (खादाड शिक्षण संस्था) ची काय समीकरण बदलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






