गुरुकृपा कॉलनीत चोरट्यांनी शिक्षक व ग्रामसेविकेच्या घरी मारला डल्ला..!
अमळनेर येथील गुरुकृपा कॉलनीतील रहिवासी अनिल हिरालाल चव्हाण हे बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरी चोरट्यांनी चोरी करत डल्ला मारला आहे.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की अनिल चव्हाण रा गुरुकृपा कॉलनी अमळनेर हे कोळपिंप्री ता. पारोळा येथे माध्यमीक शाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत तर त्यांची पत्नी हि निमझरी ता. अमळनेर येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दि. 09.11.2021 रोजी सायंकाळी 04.00 वाजेच्या सुमारास परिवारासह धुळे येथे
आईवडिलांना भेटण्यासाठी गेले होते.त्यानंतर आज दि. 10.11.2021 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसुन आला घरात प्रवेश करुन पाहिले असता आम्ही किचनमधील दरवाज्याचा कडीकोंडा तुलटलेला दिसुन आला.घरातील कपाट पाहिले असता ते उघडे मिळुन आले व कपाटातील कपडे व साहित्य अस्ताव्यस्त केलेले मिळुन आले कपाटात ठेवलेले 6 ग्रमचे मंगळसुत्र मणींसह असलेले दिसुन आले नाही.
चोरीस गेलेल्या मंगळसुत्र 18000/- रुपये किंमतीचे 6 ग्रम वजनाचे असून अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे कॉ पुरुषोत्तम वॉलदे करत आहे.






